Jatan Singh bail rejected Dainik Gomantak
गोवा

जतन सिंगला दणका; पुन्हा जामीन नाकारला, 532 ग्रॅम मेथमफेटामाइन केले होते जप्त

Jatan Singh bail rejected: अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) केलेल्या ५३२ ग्रॅम ‘मेथमफेटामाइन’ जप्ती प्रकरणातील मुख्य आरोपी जतन सिंग याला म्हापसा जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) केलेल्या ५३२ ग्रॅम ‘मेथमफेटामाइन’ जप्ती प्रकरणातील मुख्य आरोपी जतन सिंग याला म्हापसा जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. आरोपीने जामिनासाठी केलेला चौथा अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अपूर्वा नागवेकर यांनी फेटाळून लावला.

जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ व्यावसायिक प्रमाणापेक्षा तब्बल दहापट अधिक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. २७ मार्च २०२४ रोजी एनसीबीने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कांदोळी भागात एका पांढऱ्या रंगाच्या कारला अडवले होते. या कारमधील चालक आणि समोरच्या सीटच्या मधल्या भागात एका प्लास्टिक पिशवीत ५३२ ग्रॅम मेथमफेटामाइन सापडले होते.

या प्रकरणी जतन सिंग याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(सी), २२(सी), २३(सी) आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीतर्फे वकिलांनी युक्तिवाद केला की, रासायनिक विश्लेषकाने जप्त केलेल्या एकूण साठ्यापैकी केवळ ०.९७ ग्रॅम नमुन्याचीच चाचणी केली आहे. तसेच पुराव्यांमध्ये काही तांत्रिक त्रुटी असल्याचा दावा करत त्यांनी नवीन परिस्थितीनुसार जामीन देण्याची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: थोडंही संतुलन बिघडलं तर खेळ खल्लास! मृत्यूला मुठीत घेऊन काकाची लखनौच्या रस्त्यावर खतरनाक स्टंटबाजी; भन्नाट स्वॅग व्हायरल

DigiLocker Alert: डिजीलॉकर युजर्ससाठी केंद्र सरकारचा मोठा इशारा; 'या' बनावट वेबसाईटवर चुकूनही क्लिक करु नका, बँक खाते होऊ शकते रिकामे

US Green Card New Rules: "आधी अमेरिका सोडा, मगच ग्रीन कार्डसाठी अर्ज करा!", ट्रम्प सरकारचा मोठा फेरबदल; भारतीयांवर काय परिणाम होणार?

VIDEO: "तुझ्या बापाचा रस्ता आहे का?", केदारनाथच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा हाय-व्होल्टेज ड्रामा; खच्चर चालकाशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल

Dempo SC vs Sreenidi Deccan: धेंपो क्लबला अखेर बरोबरीचे समाधान, आयएफएल लढतीत श्रीनिदी डेक्कन संघाने 1-1 असे रोखले

SCROLL FOR NEXT