Vijay Sardesai

 
Dainik Gomantak
गोवा

'निरीक्षक नायक हे 'यांचे' एजंट, म्हणून महिला मोर्चेकऱ्यांवर घातला हात'

पोलिसांनी आम्हाला अडवून धक्काबुक्की केल्यानेच रस्त्यावर गोंधळ; विजय सरदेसाई

दैनिक गोमन्तक

आज गोवा फॉरवर्डचा मोर्चा पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी अडविल्यामुळे त्यांच्यात आणि विजय सरदेसाई यांच्यात बराच वेळ शाब्दीक वाद झाला. यावेळी सरदेसाई यांनी निरीक्षक नायक हे दामू नाईक यांचे एजंट असून त्यांनी महिला मोर्चेकऱ्यावर हात घातला, असा आरोप केला. हा आरोप नायक यांनी फेटाळून लावताना तुमच्या राजकारणासाठी (Politics) लोकांना वेठीस धरू नका असे बजावले. रस्ता अडवल्यामुळे कित्येक लोकांना त्रास झाला. त्यात एक गरोदर महिलाही अडकली. शेवटी वाहतुकीची कोंडी सोडवून तिला इस्पितळात नेण्यासाठी वाट करून दिली.

याविषयी विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांना विचारले असता, आमचा रस्ता अडवण्याचा कुठलाही कार्यक्रम नव्हता. आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात जात होतो. पोलिसांनी आम्हाला अडवून धक्काबुक्की केल्यानेच रस्त्यावर गोंधळ झाला व वाहतूक कोंडी झाली. याला पोलिसच जबाबदार आहेत. निरीक्षक नायक यांच्याविरुद्ध महिला आयोग आणि मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करू. पोलिसांनी जी बेहिशेबी माया जमविली आहे त्याचाही आम्ही आता शोध घेण्यास सुरवात करू, असे सरदेसाई यांनी सांगितले. दरम्यान, पोलिस (police) निरीक्षक नायक यांनी रस्ता अडविल्याबद्दल कुणावरही गुन्हा नोंद केलेला नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

Goa News Live Updates: पणजी भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

SCROLL FOR NEXT