Cm Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Naxalite In Goa:...तर नक्षलींना अटक करा

Naxalite In Goa: विरोधकांची मागणी: अन्यथा मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

दैनिक गोमन्तक

Naxalite In Goa: इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही नक्षलवादी कार्यरत आहेत, असा उल्लेख मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका कार्यक्रमात आदिवासींसाठी लढा देणाऱ्या काही समाज कार्यकर्त्यांना नजरेसमोर ठेवून केला त्याचा निषेध करून हे कोण नक्षलवादी आहेत ते स्पष्ट करावे व त्यांना अटक करावी, नाहीतर त्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल माफी मागावी, असे आव्हान काही सरकारविरोधी कार्यकर्त्यांनी आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी दिले.

यापूर्वी भाजप सरकारने पोर्तुगीजचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, अखेरपर्यंत कोण गोमंतकीय पोर्तुगीज आहेत याचे उत्तर देण्यात आले नाही. राज्यातील अनुसूचित जाती व जमातीचे प्रत्येक राजकीय पक्षामध्ये कक्ष आहेत त्यांनी आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल आवाज उठवण्याची गरज आहे.

जे आदिवासी लोक हक्कासाठी लढा देत आहेत ते नक्षलवादी होतात, तर त्यांना अटक करून कारवाई करावी, असे मत रामा काणकोणकर यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत शंकर पोळजी व प्रतिमा कुतिन्हो उपस्थित होत्या. त्यांनीही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शांतताप्रिय राज्य म्हणून देश - विदेशात गोवा राज्याचे नाव आहे.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अर्बन नक्षलवादी असा उल्लेख केला त्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. त्यांनी हे विधान सरकारविरोधात आदिवासी लोकांना त्यांच्या हक्क व अधिकारासाठी जागृत करणाऱ्या कार्यकर्त्यांना केले आहे.

या आदिवासी लोकांच्या समस्या आमदारांनी सोडवायला हव्यात मात्र त्यांना वेळ नाही. निवडणुका जवळ आल्या की सरकारला त्या समाजाबाबत आपुलकी निर्माण होते. या समाजासाठीचा सुमारे 2600 कोटींचा निधी प्रलंबित आहे तो द्यावा. या सरकारने विरोधी आमदारांना आपल्याकडे आकर्षित करून विरोधच नष्ट केला आहे अशी टीका शंकर पोळजी यांनी केली.

मग अनुसूचित जाती आरक्षणाला विलंब का?

जाती धर्म बाजूला ठेवून त्यांनी अनुसूचित जातीतील लोकांशी संबंध अधिक दृढ करा असे आवाहन केले आहे ते काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे हे लोकांनाही कळून चुकले आहे. मुख्यमंत्र्यांना अनुसूचित जातीबद्दल इतके प्रेम आहे, तर त्यांना आरक्षण देण्याबाबत एवढा विलंब का लावत आहेत असा सवाल समाज कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी केला.

अनेक वर्षांपासून लढा

राज्यातील आदिवासी लोक आपला हक्क व अधिकारासाठी गेली अनेक वर्षे लढा देत आहेत. रस्ता, पाणी व वीज या मूलभूत मागण्यांसाठी ते कित्येक वर्षे वंचित आहेत. आता लोकसभा निवडणूक जशी जवळ आली आहे तसा मुख्यमंत्र्यांना या आदिवासी लोकांचा पुळका आला आहे. जर राज्यात नक्षलवादी आहेत, तर त्यांना अटक करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का? असा सवाल समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT