Goa Politics: तानावडेंच्या वक्तव्याविरुद्ध स्वेच्छा दखल घ्यावी

Goa Politics: काँग्रेसची मागणी: विविध विरोधी पक्षांचा पाठिंबा
Sadanand  Tanavade
Sadanand TanavadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: भाजपचे प्रदेशाध्यक्ष, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी उच्च न्यायालयाचा अनादर आणि अवहेलना केल्याबद्दल न्यायालयाने याविषयी स्वेच्छा दखल घेण्याची मागणी राजकीय वर्तुळातून जोर धरू लागल्याचे दिसून येते. काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी केलेल्या ट्विटवर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.

Sadanand  Tanavade
Smart City Panjim: रस्त्याकडेची अतिक्रमणे हटविण्यात पणजी महापालिकेला अपयश

आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर, गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत आणि शिवसेनेचे (उबाठा गट) जितेश कामत यांसारख्या विरोधी पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

कवठणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, न्यायपालिकेचे पावित्र्य राखण्यासाठी, न्यायपालिका हा भारतीय लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याने कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कमी लेखण्याची आणि बदनाम करण्याची संधी दिली जाऊ नये.

अशा अराजकवाद्यांचा काँग्रेस जोरदार मुकाबला करेल, जे भारतीय लोकशाहीला धोका देतात. तसेच गोव्यात शहरी नक्षलवादी सक्रिय असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून कवठणकर म्हणतात,

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांच्याकडे त्याविषयी रोख असावा. कारण तानावडे हे न्यायालयाचा अनादर आणि अवहेलना करत आहेत. जात आणि जातीच्या आधारावर ते देशाचे विभाजन करणाऱ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com