Traffic Issues Dainik Gomantak
गोवा

Navelim Junction: सततच्या वाहतूक कोंडीने नागरिक हैराण! नावेली जंक्शनपाशी वाढता गोंधळ

Navelim Junction Traffic Issue: नावेली जंक्शनवर होणाऱ्या सततच्या वाहतुकीच्या कोंडीबद्दल स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Sameer Panditrao

मडगाव: नावेली जंक्शनवर होणाऱ्या सततच्या वाहतुकीच्या कोंडीबद्दल स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेत वाहतूक वळवावी लागण्यासारख्या त्रासदायक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली आहे.

स्थानिकांनी शाळेच्या वेळेत येथे वाहतूक पोलिस असूनही परिस्थिती आव्हानात्मक राहते, याबद्दल चिंता व्यक्त करून चांगल्या वाहतूक व्यवस्थापन करण्याची मागणी केली आहे. रहिवाशांनी पुढे सांगितले की, गर्दीच्या वेळेत येथे निर्माण होणारी परिस्थिती सहन करता येण्याजोगी नाही.

योग्य वाहतूक व्यवस्थापनाच्या अभावी नावेली जंक्शनवर वाहतूक कोंडी होत आहे. येथील स्थिती पूर्ववत करण्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात करण्याची नितांत गरज असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल करूनही परिस्थिती सुधारलेली नसून अवजड वाहने गर्दीच्या वेळेत या भागात अडकून राहतात. यामुळे आणखी बिकट स्थिती निर्माण होते, अशी कैफियत फ्रान्सिस फर्नांडिस यांनी मांडली.

नावेली चर्चजवळील अलीकडील निरीक्षणात वाहने उभी राहिल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते आणि शाळकरी मुलांसह पादचाऱ्यांना या गर्दीतून रस्ता ओलांडत मार्गक्रमण करावे लागते, असे दिसून आले आहे. अनेक स्थानिकांनी असेही निदर्शनास आणून दिले की, वाहतूक पोलिस अनेकदा गरजेच्या वेळी अनुपस्थित असतात. याव्यतिरिक्त रहदारीविषयीच्या सूचना फलकांच्या कमतरतेमुळे गोंधळ निर्माण होत आहे. पर्यटक व इतर वाहनचालकांना वारंवार दिशा विचारण्यासाठी थांबावे लागते.

कायमस्वरूपी तोडगा काढा

अॅड. प्रतिमा कुतिन्हो या स्थानिक रहिवासी असून त्यांनीही नावेली जंक्शनवरील रहदारीच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले की, रुग्णवाहिकादेखील अनेकदा येथील वाहतूक कोंडीत अडकलेल्या आहेत, ज्यातून सुटण्याचा मार्ग नसतो. तात्पुरता उपाय म्हणून गर्दीच्यावेळी वाहतूक वेस्टर्न बायपासमार्गे वळविली जाऊ शकते, असे कुतिन्हो यांनी सुचविले. स्थानिक अधिकाऱ्यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला नसल्याचे त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

Ambavali Eco Tourism: आंबावलीत 1.04 लाख चौमी.जमिनीवर ‘इको टुरिझम’ प्रकल्प! IPB ची तत्त्वतः मान्‍यता; सूचना मागवल्या

SCROLL FOR NEXT