Navelim Bele Junction Inspection
सासष्टी: जिल्हा रस्ते सुरक्षा समिती सदस्यांनी नावेली येथील बेले जंक्शनची पाहणी केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, ‘गोवा कॅन’च्या लॉर्ना फर्नांडिस, पोलिस वाहतूक सेलचे निरीक्षक संजय दळवी तसेच वाहतूक खात्यातील अधिकारी उपस्थित होते.
मात्र, आधी कळवूनही सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी याकडे पाठ फिरविली, असे सांगण्यात आले.
यावेळी वाहनचालक चुकीच्या दिशेने वाहन चालवत असल्याचे दिसून आले. पाहणीत आम्हाला जे दिसले, त्याचा अहवाल तयार करून तो जिल्हा रस्ते सुरक्षा समितीला सादर केला जाईल, असे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले.
एरवी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या पाहणीवेळी उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, हे खाते गंभीर नसल्याचे दिसते. बेले जंक्शनजवळील सर्व्हिस रोड लोकांना संभ्रमात टाकणारा आहे. येथील पथदीप दुरुस्त करायला हवेत.
वीज खांब आहेत, बल्ब आहेत; मात्र ते पेटत नाहीत, असे लॉर्ना फर्नांडिस म्हणाल्या. वाहतूक सिग्नल्स मध्येच बंद पडतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.