Feast Ground Clash Dainik Gomantak
गोवा

Feast Ground Clash: नावेलीच्या फेस्तात जमीन मालकीच्या वादातून हाणामारी; प्रवेशद्वार बंद केल्याने संघर्ष, दोघे जखमी

Navelim Land Ownership Dispute: नावेली येथील वार्षिक फेस्तानिमित्त लुईस फ्रान्सिस्को गोम्स मैदानावर भरविण्यात आलेल्या फेरीच्या जागेच्या मालकी हक्कावरून वाद उफाळून त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: नावेली येथील वार्षिक फेस्तानिमित्त लुईस फ्रान्सिस्को गोम्स मैदानावर भरविण्यात आलेल्या फेरीच्या जागेच्या मालकी हक्कावरून वाद उफाळून त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

मैदानाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या या प्रकारात नावेली येथील शांथू फर्नांडिस आणि सां जुझे दि अरियाल येथील जायंट व्हीलचे मालक कादर शेख हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैदानाच्या जागेवर मालकी हक्क असल्याचा दावा करीत शांथू फर्नांडिस यांनी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. त्याचवेळी कादर शेख यांना आपले वाहन मैदानाबाहेर काढायचे असल्याने त्यांनी दरवाजा उघडण्याची मागणी केली. यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.

वाद वाढल्यानंतर शांथू यांनी कादर शेख यांच्या डोक्यावर पादत्राणाने प्रहार केला. त्यानंतर तेथे जमलेल्या जमावाने शांथू यांना मारहाण केली. या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या एका मुलालाही मारहाण करण्यात आली. या प्रकारात शांथू आणि कादर शेख जखमी झाले.

पंचायतीचीही परवानगी नसल्याचा दावा

या जमिनीचा वाद मामलेदारांसमोर सुनावणीसाठी प्रलंबित असून, पंचायतीनेही या जागेवर फेरी भरविण्यास परवानगी दिलेली नाही, असा दावा शांथू यांच्या वकिलांनी केला आहे. बेकायदा फेरी भरविणारे कादर शेख, त्यांचा मुलगा आणि इतर संबंधितांविरोधात तसेच मारहाणीप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच मडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही जखमींवर उपचार सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: गोव्यात धमकी, तोतयागिरी अन् सायबर फसवणुकीचा सापळा; 2 महिलांना 31.91 लाखांचा गंडा, तिघांना अटक

IND vs NZ Test: हक्काची विकेट हुकल्याने गिल नाराज! फिलिप्सच्या एलबीडब्ल्यूवर हायव्होल्टेज ड्रामा; खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल

Goa AI Policy 2026: 'गोवा एआय' धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; कौशल्य विकासासाठी 60 टक्के, स्टार्टअप आणि पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी 20 टक्के निधी

Sanquelim Naturopathy Hospital: साखळीत लवकरच उभारले जाणार 50 खाटांचे आयुर्वेदिक व नॅचरोपॅथी हॉस्पिटल VIDEO

Sanquelim Naturopathy Hospital: साखळीत 50 खाटांचे नॅचरोपॅथी इस्पितळ उभारणार; CM डॉ. प्रमोद सावंत यांचा निर्धार

SCROLL FOR NEXT