IND vs NZ Test: हक्काची विकेट हुकल्याने गिल नाराज! फिलिप्सच्या एलबीडब्ल्यूवर हायव्होल्टेज ड्रामा; खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल

Shubman Gill Argument With Umpire Drs Decision: तिसऱ्या अंपायरच्या या निर्णयावर शुभमन गिल नाराज दिसला. चेंडू थेट पॅडवर आदळल्याचा आणि बॅट व चेंडूमध्ये अंतर असल्याचा दावा करत त्याने तात्काळ अंपायरशी संवाद साधून आपली नाराजी व्यक्त केली.
Shubman Gill Argument With Umpire Drs Decision
Shubman Gill Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shubman Gill Argument With Umpire Drs Decision: भारत-न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली असून, पहिल्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे सार्थ ठरला आणि भारतीय वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडची अवस्था अवघ्या 70 धावांत निम्मा संघ बाद अशी केविलवाणी झाली. मात्र, या सामन्यादरम्यान मैदानावर एक मोठा वाद पाहायला मिळाला, ज्यात शुभमन गिल अंपायरच्या निर्णयावर नाराज पाहायला मिळाला.

डावाच्या 31व्या षटकात जसप्रीत बुमराहचा भेदक चेंडू आत वळला आणि थेट ग्लेन फिलिप्सच्या पॅडवर आदळला. भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले, परंतु अंपायरने त्याला नाबाद ठरवले. त्यानंतर गिल आणि बुमराह यांच्यात चर्चा झाली; चेंडू बॅटला लागलेला नाही असे गिलला वाटले, तर चेंडू बेल्सवरुन जाण्याची शंका बुमराहला होती. अखेर गिलने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तिसरे अंपायर पॉल रिफेल यांनी पाहिले असता चेंडू बॅटजवळून जाताना स्पाइक दिसून आला आणि चेंडूला हलके वळण मिळाल्याचे मानून त्यांनी नाबादचा निर्णय कायम ठेवला.

तिसऱ्या अंपायरच्या या निर्णयावर शुभमन गिल नाराज दिसला. चेंडू थेट पॅडवर आदळल्याचा आणि बॅट व चेंडूमध्ये अंतर असल्याचा दावा करत त्याने तात्काळ अंपायरशी संवाद साधून आपली नाराजी व्यक्त केली. बुमराहच्या चेहऱ्यावरही नाराजी स्पष्ट दिसत होती, मात्र अंतिम निर्णय मान्य करावा लागल्याने गिल काही वेळाने तिथून निघून गेला आणि भारताला एक महत्त्वाचा रिव्ह्यू गमवावा लागला. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Shubman Gill Argument With Umpire Drs Decision
IND vs NZ Test Series: न्यूझीलंडच्या भूमीवर टीम इंडियाचा चिंता वाढवणारा कसोटी रेकॉर्ड, 58 वर्षांत केवळ 2 मालिका विजय; गिल सेनेपुढे इतिहास बदलण्याचे मोठे आव्हान

दरम्यान, दीर्घ विश्रांतीनंतर परतलेल्या बुमराहने सुरुवातीलाच कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर बाद करत किवींना धक्का दिला, तर डॅरेल मिशेल आणि टॉम ब्लंडेल यांनाही माघारी धाडले. आकाशदीप आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी एक बळी घेत बुमराहला उत्तम साथ दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.