Cyber Crime: गोव्यात धमकी, तोतयागिरी अन् सायबर फसवणुकीचा सापळा; 2 महिलांना 31.91 लाखांचा गंडा, तिघांना अटक

Goa Financial Fraud Cases: नेरुल, मडगाव आणि फातोर्डा परिसरात घडलेल्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये एका कामगाराला लुटण्यात आले, तर दोन महिलांची मिळून ३१ लाख ९१ हजार ८१२ रुपयांची फसवणूक झाली.
Goa Financial Fraud Cases
Cyber CrimeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: कधी पोलिस अधिकारी असल्याचे भासवून धमकी देत लूट, तर कधी नोकरीचे आमिष किंवा सरकारी यंत्रणांमधील ओळखींचा प्रभाव दाखवून आर्थिक गंडा, अशा वेगवेगळ्या मार्गांनी नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार गोव्यात सुरूच आहेत. नेरुल, मडगाव आणि फातोर्डा परिसरात घडलेल्या तीन स्वतंत्र घटनांमध्ये एका कामगाराला लुटण्यात आले, तर दोन महिलांची मिळून ३१ लाख ९१ हजार ८१२ रुपयांची फसवणूक झाली. या तिन्ही प्रकरणांत पोलिसांनी कारवाई केली असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.

नेरुल येथे पोलिस अधिकारी असल्याचे भासवून एका कामगाराला अडवून १० हजार रुपये लुटल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी अगोस्तिन्हो कार्व्हालो (४३, माजोर्डा) याला काही तासांत अटक केली. मूळचा बिहारचा असलेला व सध्या मायणा-पिळर्ण येथे राहणारा अजय कुमार साहनी (३३) हा १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सायकलवरून घरी जात असताना फट्टावाडो-नेरुल येथे आरोपीने त्याला अडवले.

Goa Financial Fraud Cases
Goa AI Policy 2026: 'गोवा एआय' धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; कौशल्य विकासासाठी 60 टक्के, स्टार्टअप आणि पायाभूत सुविधांसाठी प्रत्येकी 20 टक्के निधी

दुसऱ्या घटनेत सोशल मीडियावरील हॉटेल रेटिंगच्या कामाचे आमिष दाखवून आके येथील कविता वेळीप (४२) यांची ८ लाख ५० हजार ५३२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ७ ते १२ नोव्हेंबरदरम्यान इन्स्टाग्रामवरील जाहिरातीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून हॉटेलला रेटिंग दिल्यास चांगले मानधन मिळेल, असे सांगण्यात आले. खात्यावर बनावट नफा दाखवून तो काढण्यासाठी आणखी पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले.

महिलेची २३ लाख ४१ हजारांची लुबाडणूक

तिसऱ्या घटनेत न्यायालयीन अधिकारी, बँक अधिकारी आणि सरकारी यंत्रणांमध्ये ओळख असल्याचे भासवून बड्डे येथील रिमा बांदोडकर यांची २३ लाख ४१ हजार २८० रुपयांची फसवणूक झाली. तसेच घटस्फोटाचे प्रकरण, मालमत्तेचे वाद आणि बँक कर्जाचे प्रश्न सोडवून देण्याचे आश्वासन आके येथील रेक्सी रेखा डॅनियल अमोलिक (४७) हिने दिले होते. सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान तक्रारदाराकडून १८ लाख ३५ हजार रुपये रोख, तर ५ लाख ६ हजार २८० रुपये यूपीआयद्वारे स्वीकारण्यात आले. या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी संशयित महिलेला अटक केली असून, उपनिरीक्षक सचिन पाटील तपास करीत आहेत.

Goa Financial Fraud Cases
Goa Tourist Touts: 'टाऊट्सची पाळेमुळे उखडून टाका'; ड्रग्ज, वेश्याव्यवसायातही सहभाग असल्याचा रोहन खंवटेंचा आरोप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.