सासष्टी: नावेली ते कुंकळ्ळी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण हा चर्चेचा व वादाचा विषय ठरू लागला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या केवळ चौपदरी रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवला होता. शिवाय लोकांना चालण्यासाठी दोन्ही बाजूने पथपदाची व्यवस्थाही होती. या रुंदीकरणामुळे लोकांची घरे व शेत जमीन जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले असले तरी त्यावर उपाय म्हणून आता या राष्ट्रीय महामार्गादरम्यान तीन उड्डाण पुलांचा प्रस्ताव पुढे करण्यात आल्याचे समजते.
बेले (नावेली), दांडेवाडो (चिंचोणे) व पांझरखणी (कुंकळ्ळी) या तीन ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे.
या ६.५ किमी.राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण लोकांची, प्रवाशांची सुरक्षा तसेच कनेक्टिविटीसाठी करण्यात येत आहे. एरव्ही स्थानिकांना त्रास होऊ नये म्हणून उड्डाण पुलांचा प्रस्ताव आहे. तरी त्यामुळे स्थानिकांचा प्रतिकार आणखी प्रज्वलित केला आहे, असे बोलले जाते. या रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग अधिकारिणीने जवळ जवळ २४ हेक्टर जमीन संपादित केली आहे.
नावेली येथील बेले जंक्शन हे पूर्वीपासून वादात आहे. तिथे अनेक अपघातही झालेले आहेत व होत आहेत. अजून उड्डाण पूल बांधणीचे काम सुरू झालेले नाही. केंद्रीय मंत्रालयाकडून संमती मिळाल्यावरच हे काम सुरू करावे,असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केंद्र व राज्य सरकार यावर कसा तोडगा काढतात, याकडे सर्व संबंधीतांचे लक्ष लागून आहे.
दांडेवाडो येथील लोकांना उड्डाणपुलाऐवजी बगल रस्ता पाहिजे. पांझरखणी येथील उड्डाण पूल कुंकळ्ळीच्या प्रवेशद्वारावर प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतुक सुरळीत होईल त्याच बरोबर कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीसाठी हा उड्डाणपूल उपयोगी ठरले. तरी उड्डाण पुलामुळे काही स्थानिकांची घरे पाडावी लागतील, ही सुद्धा भीती आहे. त्यामुळे विरोध वाढत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.