Navelim Health Centre: नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम सरकारने स्थगित केल्याचे आरोग्य खात्यातील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे
Construction StopsDainik Gomantak

Navelim News: पुन्हा अडथळा! नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम स्थगित; आरोग्य खात्याचे सरकारकडे बोट

Navelim Health Centre: नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम सरकारने स्थगित केल्याचे आरोग्य खात्यातील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे
Published on

Navelim Health Centre Building Construction

सासष्टी: नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम सरकारने स्थगित केल्याचे आरोग्य खात्यातील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. बारा खाटांची सोय असलेला एक विभाग बांधण्याचा प्रस्ताव गेली आठ वर्षे रखडत आहे. त्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ या केंद्राच्या जवळ असल्याचे कारण देण्यात येत आहे.

अधिकाऱ्याने सांगितले, की दुसऱ्या टप्प्याच्या कामाला तांत्रिक संमती देण्यात आली होती. गेली दोन वर्षे फाईल वित्त खात्यात पडून होती.

नावेली आरोग्य केंद्रात अनेक सुविधा उपलब्ध नसल्याचे जाणवत आहे. सर्वप्रथम एम्ब्युलन्सची व्यवस्था उपलब्ध नसते. संध्याकाळी चार वाजल्यानंतर प्राथमिक उपचारासाठीसुद्धा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात जावे लागते. नावेली ग्रामसभेतसुद्धा या विषयावर चर्चा झाली होती. या आरोग्य केंद्रात २४ तास डॉक्टर उपलब्ध पाहिजे. तसेच दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याची मागणी या ग्रामसभेत करण्यात आली होती.

Navelim Health Centre: नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम सरकारने स्थगित केल्याचे आरोग्य खात्यातील सुत्रांकडून सांगण्यात येत आहे
Navelim News: रोझरी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीला स्थानिकांचा विरोध

दुसरा टप्पा लवकरच बांधुन तिथे २०२५ पर्यंत प्रसुती विभाग, अस्थिरोग विभाग सुरू करण्याचा विचार होता.

या आरोग्य केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे उद्‍घाटन २०१६ साली आवेर्तान फुर्तादो आमदार होते तेव्हा झाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी लुईझिन फालेरो यांनीसुद्धा प्रयत्न केले. विकलांग रुग्णांसाठी व्यवस्था करण्याचा प्रश्र्न २०२० साली उपस्थित करण्यात आला होता.

नावेली आरोग्य केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे काम स्थगित करणे यासारखे दुसरे दुर्दैव नाही. आम्ही पंचायत बैठकीत या विषयावर चर्चा करून पुढील कृती ठरवू.

लुसिया कार्वालो, सरपंच, नावेली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com