Navelim 6-year-old boy dies in car accident Dainik Gomantak
गोवा

भरधाव कारच्या धडकेत चिमुकल्याचा बळी

कार चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

मडगाव : बेले नावेली येथे रस्ता ओवलांडणाऱ्या मुलाला कारची धडक बसल्याने त्याचे निधन झाले आहे. अपघातादरम्यान बघ्यांनी गर्दी केल्यामुळे रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम झाली होती. या प्रकरणी मडगाव (Margao) पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंद केला आहे.

ही घटना काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. नीरज बुधनवर हा सहा वर्षांचा मुलगा रस्ता ओलांडत असताना त्याला कारची धडक बसली. त्याला उपचारासाठी गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री उशिरा तिथे त्याचे निधन (Death) झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आज काणकोणमध्ये (Canacona) बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. पेडे-लोलये येथील दिलीप राम सतरकर याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. भरवस्तीत बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिक दहशतीत असल्याचं चित्र आहे.

पेडे-लोलये येथील दिलीप राम सतरकर(वय 45) यांच्यावर गुरुवारी 24 मार्च रोजी रात्री बिबट्याने (Leopard) हल्ला केला. घराजवळ फिरत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. त्याला उपचारासाठी काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! गोव्यात विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित; बस चालकांसाठी 'पोलीस व्हेरिफिकेशन' बंधनकारक

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

SCROLL FOR NEXT