National Sports Competition Dainik Gomantak
गोवा

National Sports Competition :राष्ट्रीय स्पर्धेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

स्पर्धेसाठी आरोग्य खात्याने प्रत्येक ठिकाणी २५ हून अधिक विशेष आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

National Sports Competition पणजी, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी गोमेकॉ इस्पितळातील तसेच आरोग्य खात्याने स्पर्धेच्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी आपत्कालीन आरोग्य सेवा कक्ष तसेच गोमेकॉ इस्पितळामध्ये विशेष आपत्कालीन विभाग स्थापन करण्यात आला आहे. स्पर्धेतील खेळाडूंची ‘ॲण्टीडोपिंग’ चाचणी ‘नाडा’ एजन्सीमार्फत केली जाणार आहे.

स्पर्धेसाठी आरोग्य खात्याने प्रत्येक ठिकाणी २५ हून अधिक विशेष आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. स्पर्धेचे ठिकाण ते गोमेकॉ इस्पितळ यादरम्यान ‘हॉटलाईन’ सेवेची व्यवस्था केली आहे.

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या साहाय्याने आरोग्य खात्याने २७ स्पर्धेच्या ठिकाणी विशेष आपत्कालीन आरोग्य सेवा केंद्रे स्थापन केली आहेत. या केंद्रांमध्ये जखमी खेळाडूंवर डॉक्टर्स प्रथमोपचार करतील.

या ठिकाणी रुग्णवाहिका २४ तास तैनात असेल. गंभीर जखमी झालेल्या स्पर्धकांना गोमेकॉत उपचारासाठी नेले जाईल. राज्यातील काही आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांसह काही खासगी रुग्णवाहिकाही यासाठी घेतल्या आहेत.

प्रत्येक स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टर्स, परिचारिका तसेच मदतनीस यांची वर्णी लावली आहे. प्रथमोपचारासाठी लागणारा औषध साठा तेथे उपलब्ध केला आहे. दुचाकीवरील ॲम्ब्युलन्सचाही वापर केला जाणार आहे. या केंद्रांवर आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांचे लक्ष असेल, अशी माहिती देण्यात आली.

गोमेकॉत विशेष आपत्कालीन विभाग स्थापन केला आहे. जखमी स्पर्धकांना विशेष उपचार देण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, फिजिओथेरपिस्ट तसेच मदतनीस २४ तास तैनात केले आहेत. सिटी स्कॅन, अल्ट्रासाऊंड, एमआरआय, एक्स-रे तपासणीसाठी वेगळी यंत्रणा ठेवली आहे.

तीन तज्ज्ञांचे पथक

गंभीर जखमी झालेल्या खेळाडूंवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी गोमेकॉत ‘हॉटलाईन’ सेवा उपलब्ध केली आहे. स्पर्धेच्या ठिकाणी असलेल्या आपत्कालीन आरोग्य सेवा केंद्रांना ती जोडली आहे.

त्यामुळे खेळाडूला स्पर्धेच्या ठिकाणाहून गोमेकॉत आणण्यापूर्वी सर्व ती तयारी ठेवण्यास त्याची मदत होणार आहे. या स्पर्धेदरम्यान गोमेकॉतील आपत्कालीन विभागावर देखरेख ठेवण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक राजेश पाटील यांच्यासह तिघांचे पथक स्थापन केले आहे, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT