National Highway work in Goa for commission only Francisco Sardinha

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम केवळ कमिशनसाठीच : फ्रान्सिस सार्दिन

गोव्यात राष्ट्रीय महामार्गाची कामे स्थानिक सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत (PWD) केली जात आहेत ते केवळ कमिशन खाण्यासाठी चालले आहे, असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन (Francisco Sardinha) यांनी केला.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: राष्ट्रीय महामार्गाची (National Highway) कामे एरव्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत केली जातात. मात्र गोव्यात स्थानिक सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत (PWD) केले जात आहे ते केवळ कमिशन खाण्यासाठी चालले आहे, असा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन (Francisco Sardinha) यांनी केला.

पुढील सरकार आपलाच पक्ष घडवेल हे केवळ कॉंग्रेस (Congress) व भारतीय जनता पक्ष (BJP) हे दोनच पक्ष छातीठोकपणे सांगतात. बाकीचे पक्ष केवळ आपले अस्तित्व दाखविण्यासाठी निवडणूक लढवित आहेत. कॉंग्रेस पक्षाने गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त केले. गोव्याला घटक राज्याचा दर्जा दिला. ओपीनियन पोलद्वारे गोव्याचे अस्तित्व टिकविले. सध्या ज्या राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी होत आहे त्याची प्रक्रिया कॉंग्रेस राजवटीतच सुरू झाली होती, असेही सार्दिन यांनी सांगितले.

गोव्यात पुढील दीड ते दोन महिन्यांच्या आत विधानसभेच्या निवडणुका (Goa Assembly Elections 2022) होतील. तेव्हा जे लोकांची सेवा निष्ठेने व कर्तबगारीने करू शकतील, अशा उमेदवारांनाच निवडून द्या, असे आवाहनही सार्दिन यांनी केले.

कंत्राटी कामगारांना कायम करा..

कोविडच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली त्यांना नोकरीसाठी प्राधान्य द्यावे. वीज खात्यात ८-१० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करतात त्यांना कायम करावे. वीज बीले जनतेला नियमितपणे देणे. पाणी बिलांमध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्या तात्काळ सुधारून जनतेला सुधारीत बिले द्यावीत, अशा सूचना सार्दिन यांनी मुख्यमंत्री सावंत यांना व संबंधित मंत्र्यांना केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT