गोव्यात धाकधूक वाढली, एकाच दिवसात 1002 कोरोनाबाधित

कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही प्रशासन सुस्त, पर्यटकांचा मुक्त संचार
Corona Wave in Goa

Corona Wave in Goa

Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. काल बुधवारी एकाच दिवसात तब्बल 1002 बाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे गोव्यात धाकधूक वाढली आहे. गोव्यात कोरोनाची तिसरी लाट (Corona Wave in Goa) आल्याचं आरोग्य विभागाने आधीच जाहीर केलं आहे.

Corona Wave in Goa

आठ वर्षांत 22 हजार कोटींची विकासकामे

गोव्यात (Goa) 24 तासात 1002 रुग्ण सापडल्याने कोरोनोचा (Corona) विळखा आणखी घट्ट होत चालल्याचं चित्र आहे. त्यातच गोव्यात अजूनही निर्बंध न लादल्याने पर्यटकांचा मुक्त संचार सुरुच आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांमुळे गोव्यातील समुद्रकिनारे अजूनही गजबजलेलेच आहेत. मात्र बिचवर फिरणाऱ्या पर्यटकांकडून नियमांना सर्रासपणे केराची टोपली दाखवली जात असल्याचं दिसत आहे.

Corona Wave in Goa

चिखलीत प्रवासी बस ला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

कोरोना संसर्ग वाढत असला तरीही राजकीय कार्यक्रम सुरुच असल्याने धोका आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. राजकीय कार्यक्रमांना लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याने समूह संसर्गाचा धोकाही जास्त आहे. मात्र सत्ताधारी भाजपसह (BJP) विरोधी पक्षही ज्यांनी निर्बंध लादण्याची मागणी केली, ते सारेच राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचं दिसत आहे. साहजिकच याचा फटका दररोज बसताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.

Corona Wave in Goa

लोककला सादर करताना पार्वती सावंत यांचा आगीत होरपळून मृत्यू

शाळा बंद करण्यास विलंब भोवण्याची भीती

दरम्यान गोवा राज्यातील शाळा (School) आजपासून बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहेत. सातवी ते बारावी पर्यंतचे वर्ग 26 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याबाबतचं परिपत्रक काल बुधवारी काढण्यात आलं. त्यामुळे आता सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. केवळ कोरोना लसीकरणासाठीच विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याचे स्पष्ट निर्देश परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com