Goa National Handloom Day Dainik Gomantak
गोवा

National Handloom Day: कुणबी साडीचा सन्मान! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'द प्राईड ऑफ गोवन टेक्स्टाईल' प्रदर्शन सुरू

Kunbi saree exhibition Goa: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ११ व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पणजी येथे 'कुणबी: द प्राईड ऑफ गोवन टेक्स्टाईल' या हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले

Akshata Chhatre

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ११ व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पणजी येथे 'कुणबी: द प्राईड ऑफ गोवन टेक्स्टाईल' या हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर, आमदार कृष्णा साळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. गोव्याची समृद्ध वस्त्र परंपरा आणि वारसा जपण्याच्या उद्देशाने 'कुणबी: द प्राईड ऑफ गोवा टेक्सटाईल' या हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कुणबी साडीसह गोव्याच्या वस्त्रोद्योगातील कलाकारांचे कौतुक केले. ते म्हणाले की, "या प्रदर्शनातून आपल्या प्रतिभावान कलाकारांचे उत्कृष्ट काम समोर आले आहे. त्यांची निष्ठा आणि कौशल्य गोव्याच्या पारंपरिक वस्त्रांना एक वेगळी ओळख मिळवून देत आहे. यामुळे आपल्या समृद्ध वस्त्र परंपरेला नवसंजीवनी मिळाली आहे."

हे प्रदर्शन गोव्याच्या स्थानिक कला आणि कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. कुणबी साडी ही गोव्याच्या पारंपरिक वस्त्रांपैकी एक असून, या प्रदर्शनामुळे या कलेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यास मदत होणार आहे.

विधानसभेत 'कुणबी'चा समावेश

विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजात कुणबी शाल पांगरून मंत्र्यांनी गोव्यातील या पारंपरिक वस्त्राचा बहुमान केला. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह सभापती तवडकर आणि इतर आमदार देखील कुणबी शालीसह पाहायला मिळाले.

कुणबी वस्त्र म्हणजे काय?

कुणबी वस्त्र म्हणजे गोव्यातील कुणबी आदिवासी समुदायाशी संबंधित एक विशिष्ट प्रकारचे हातमाग वस्त्र. हे कापड त्याच्या लाल रंगाच्या चौकटी पॅटर्नसाठी ओळखले जाते. या साध्या पण मोहक डिझाइनमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. कुणबी साडी, जी याच वस्त्रापासून बनवली जाते, ती पारंपरिकरित्या कुणबी महिला, विशेषतः भातशेतीच्या कामाशी संबंधित महिला परिधान करत असत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

Rohit-Virat Comeback: चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी पुन्हा मैदानात उतरणार रोहित-विराट; ऑस्ट्रेलियात रंगणार रणसंग्राम

Goa Assembly Live: म्हादई अहवालाविषयी जलस्रोत खात्याने एनआयओला विचारणा केली आहे काय?

CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

SCROLL FOR NEXT