National Green Tribunal Stay Dainik Gomantak
गोवा

National Green Tribunal Stay: मुरगाव बंदराच्या खोलीकरणाला ब्रेक! पर्यावरणीय अभ्यासावर प्रश्न उपस्थित करत हरित लवादाचा आदेश

Mormugao Port Expansion: मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या प्रवेशद्वार चॅनेलचे खोलीकरण आणि भांडवली उपसा प्रकल्पाला राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे येथील पश्चिम विभागीय खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मुरगाव पोर्ट प्राधिकरणाच्या प्रवेशद्वार चॅनेलचे खोलीकरण आणि भांडवली उपसा प्रकल्पाला राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे येथील पश्चिम विभागीय खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. पर्यावरणीय परिणामांचा पुरेसा अभ्यास न केल्याचा मुद्दा उपस्थित करीत रूपेश शिंकरे व इतरांनी दाखल केलेल्या अंतरिम अर्जावर हा आदेश देण्यात आला.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २१ जुलै २०२५ रोजी या प्रकल्पाला पर्यावरण आणि किनारपट्टी नियामक क्षेत्राची (सीआरझेड) मंजुरी दिली होती. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने या मंजुरीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

प्रकल्पांतर्गत बंदराच्या प्रवेशद्वार चॅनेलचे खोलीकरण करून कॅपसाईज प्रकारच्या अतिविशाल जहाजांची वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे.

नोव्हेंबरमध्ये सुनावणी!

लवादाने मुरगाव प्राधिकरणाला दोन आठवड्यांत अभ्यास अहवालासंबंधी पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकल्प प्रवर्तकाला मानक अटींच्या पालनाची माहिती तक्त्यात देण्यासाठी तीन आठवड्यांची अंतिम संधी दिली. याचिकाकर्त्यांना प्रत्युत्तरासाठी दोन आठवडे देण्यात आले असून, पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Fast Patrol Vessel: गोवा शिपयार्डची मोठी कामगिरी! भारतीय तटरक्षक दलाच्या 'अजित' गस्ती जहाजाचे राष्ट्रार्पण

Rohit Sharma Fan: रोहित शर्मा वर्ल्ड कप जिंकणार तेव्हाच दाढी करणार अन् केस कापणार! हिटमॅनच्या चाहत्याचा हटके संकल्प चर्चेत

Goa AI Residency Programme: गोव्यातील लघुउद्योगांना मिळणार 'एआय'ची जोड; मांद्रेत 13 ते 29 ऑक्टोबरदरम्यान विनामूल्य निवासी कार्यक्रम

Abhijeet Dipke Detained: विमानात घुसून दिल्ली पोलिसांची धडक कारवाई, अभिजीत दीपकेसह CJP नेते ताब्यात; विमानतळावर हाय-व्होल्टेज ड्रामा VIDEO

Mental Health: लाइक्स, कमेंट्स अन् फॉलोअर्सच्या मागे धावताय? सोशल मीडियाच्या सवयींचा मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT