श्रुंगी बांदेकर, संजना प्रभुगावकर Dainik Gomantak
गोवा

National Games 2023: श्रुंगी, संजनामुळे गोव्याच्या खात्यात 2 पदके; राज्याला आत्तापर्यंत एकूण 30 पदके

बीच फुटबॉलमध्ये पदक पक्के

किशोर पेटकर

National Games Goa 2023: श्रुंगी बांदेकर व संजना प्रभुगावकर या गोव्याच्या जलतरणपटूंनी लौकिकास साजेशी कामगिरी बजावताना 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला जलतरणात दोन ब्राँझपदके जिंकून दिली.

त्यामुळे यजमांनाची आता स्पर्धेतील एकूण पदकसंख्या 30 झाली.

कांपाल येथील जलतरण तलावात श्रुंगीने महिलांच्या 400 मीटर मेडली शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावताना 5 मिनिटे 13.69 सेकंद वेळ नोंदविली. बंगळूर येथे प्रशिक्षण घेणाऱ्या श्रुंगीचे हे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सलग दुसरे पदक ठरले.

तिने गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 200 मीटर मेडलीत ब्राँझपदक जिंकले होते. मंगळवारी श्रुंगीने ब्राँझपदकाची कमाई करताना मध्य प्रदेशची चाळीस वर्षीय आणि सातव्यांदा स्पर्धेत सहभागी झालेली जलतरणपटू रिचा मिश्रा हिला मागे टाकले.

संजनाने घरच्या जलतरण तलावात सलग दुसरे पदक जिंकले. दोन दिवसांपूर्वी तिने महिलांच्या 200 मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते.

मंगळवारी 16 वर्षीय दुबईत प्रशिक्षण घेणाऱ्या संजनाने महिलांच्या 200 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत 2 मिनिटे 23.64 सेकंद वेळेसह ब्राँझपदकाची कमाई केली. आपली ही या शर्यतीतील सर्वोत्तम वेळ असल्याचे संजनाने सांगितले.

बीच फुटबॉलमध्ये अंतिम फेरी

गोव्याच्या पुरुष फुटबॉल संघाने मंगळवारी बीच फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उपांत्य लढतीत त्यांनी लक्षद्वीपला हरविले. सुवर्णपदकाच्या लढतीत गोव्यासमोर केरळचे आव्हान असेल.

गोव्याची एकूण पदके

  • 2............ सुवर्ण

  • 5............. रौप्य

  • 23........... ब्राँझ

  • 30......... एकूण

‘‘माझे जलतरण स्पर्धेतील आणखी दोन प्रकार बाकी आहेत. त्यामुळे मला पदकांच्या हॅटट्रिकची संधी आहे आणि ती साधण्याचे लक्ष्य मी बाळगले आहे.’’

- श्रुंगी बांदेकर, गोव्याची जलतरणपटू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT