Rani Rampal: हॉकी संघाची माजी कर्णधार चौथ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी; भारताकडून नोंदवलेत 120 गोल

ज्येष्ठ खेळाडू नवोदितांसाठी प्रेरणास्त्रोत - राणी रामपाल; सुवर्ण राखण्याचे हरियानाचे उद्दिष्ट...
Rani Rampal
Rani Rampal Dainik Gomantak

Rani Rampal in 37th National Games Goa 2023: भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार, आता राष्ट्रीय 17 वर्षांखालील मुलींच्या संघाची प्रशिक्षक असलेली राणी रामपाल चौथ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली आहे.

यावेळी नवोदित युवा हॉकीपटूंसाठी प्रेरणास्त्रोत बनताना हरियानाचे सुवर्णपदक राखण्याचे उद्दिष्ट या 28 वर्षीय दिग्गज हॉकीपटूने बाळगले आहे. ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हॉकी सामने पेडे-म्हापसा येथी हॉकी स्टेडियमवर सुरू आहेत. या स्पर्धेत राणी हरियानाच्या महिला संघाचे नेतृत्व करत आहे.

पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याविषयी राणी म्हणाली, ‘‘जेव्हा मी नवोदित होते, तेव्हा संघातील ज्येष्ठ खेळाडू आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले. सध्याच्या हरियाना महिला संघात बऱ्याचजणी नवोदीत आहेत.

त्यांना माझ्याकडून प्रेरणा मिळाली, तर भारतीय हॉकीसाठी ते माझे महत्त्वपूर्ण योगदान ठरेल. त्यामुळे मी संघाचे नेतृत्व करत आहे.’’

राणीच्या नेतृत्वाखाली हरियानाच्या महिलांनी पहिल्या लढतीत तमिळनाडूचा 8-0 असा धुव्वा उडविला. तिच्याच नेतृत्वाखाली गतवर्षी गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हरियानाने महिला हॉकीचे विजेतेपद पटकावले होते.

Rani Rampal
World Cup 2023: सहा सामने जिंकूनही भारत सेमीफायनलपासून अद्यापही लांब, नेमकं कारण काय? जाणून घ्या

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेने उघडले द्वार

राणी रामपाल 2007 साली गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वप्रथम खेळली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. भारतातर्फे 250 हून जास्त आंतरराष्‍ट्रीय हॉकी सामने खेळताना राणीने 120 गोल नोंदविले. तिने राष्ट्रीय संघाचे नेतृत्वही केले.

‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला माझ्या ह्रदयात खास स्थान आहे. 2007 साली मी पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि त्या स्पर्धेतील लक्षवेधक कामगिरीची दखल घेऊन माझी राष्ट्रीय शिबिरात निवड झाली. एकंदरीत भारताच्या महिला संघाचे द्वार मला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळेच खुले झाले. त्यामुळेच या स्पर्धेत खेळताना प्रेरित असते.’’

प्रत्येक क्रीडापटूसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणे गौरवास्पद असते, पण ज्या व्यासपीठावरून यशोगाथेला सुरवात झाली त्या राज्याचे प्रतिनिधित्व नेहमीच स्मरणात ठेवायला हवे, असे राणी म्हणाली.

Rani Rampal
Virat Kohli: काय सांगता, इडनवर दिसणार 70 हजार विराट! 'किंग कोहली'साठी गांगुलीचा स्पेशल प्लॅन

ऑलिंपिकमध्येही चमक

आशियाई क्रीडा स्पर्धेत राणी रामपालने भारतीय महिला हॉकी संघाचे प्रतिनिधित्व करताना 2014 साली ब्राँझ, तर 2018 साली ती कर्णधार असताना संघाने रौप्यपदक जिंकले.

टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने राणीच्या नेतृत्वाखाली चौथा क्रमांक पटकावला होता.

2010 साली वयाच्या 15 व्या वर्षी राणीने विश्वकरंडक महिला हॉकी स्पर्धेत खेळण्याचा मान मिळविला होता. त्यापूर्वी वयाच्या 14 व्या वर्षी तिने भारतातर्फे आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2020 साली केंद्र सरकारने तिला ‘पद्मश्री’ने सन्मानित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com