National Coconut Conference Goa Dainik Gomantak
गोवा

National Coconut Conclave: नारळ उत्‍पादनवाढीचा ‘रोडमॅप’! दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषद; तज्‍ज्ञ, शेतकऱ्यांच्‍या अनुभवांची देवाणघेवाण

National Coconut Conference Goa: पनीरसेल्वम यांचे (गुरुवारी) सायंकाळी राज्यात आगमन झाले. ‘गोमन्तक’ने सकाळ परिवारातील कृषी वर्तमानपत्र ‘ॲग्रोवन’ यांचे आयोजनात सहकार्य घेतले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ‘गोमन्तक’ने राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय नारळ परिषदेचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते (ता. १०) सकाळी १० वाजता दोनापावल येथील गोवा इंटरनॅशनल सेंटरमध्ये होणार आहे.

केवळ निमंत्रितांसाठी असलेल्या या परिषदेच्या उदघाटन सोहळ्यास राज्‍याचे कृषिमंत्री रवी नाईक, तामिळनाडूचे कृषी व शेतकरी कल्याणमंत्री एम. आर. के. पनीरसेल्वम, कर्नाटकचे कृषिमंत्री एन. चलुवरायस्वामी, महाराष्‍ट्राचे फलोत्‍पादन मंत्री भरत गोगावले उपस्थित राहतील.

पनीरसेल्वम यांचे (गुरुवारी) सायंकाळी राज्यात आगमन झाले. ‘गोमन्तक’ने सकाळ परिवारातील कृषी वर्तमानपत्र ‘ॲग्रोवन’ यांचे आयोजनात सहकार्य घेतले आहे.

चर्चेतून मिळणार पथदर्शी आराखडा

१या राष्ट्रीय नारळ परिषदेत नारळ आणि माड बागायतींच्या सर्व अंगांनी उद्या दिवसभर सखोल चर्चा होणार आहे. या परिषदेत अनुभवी असे २० तज्ज्ञ आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा ठेवा उघड करणार आहेत.

२नारळ उत्पादन घटण्यामागील कारणांपासून ते नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत आणि नफा देणारी माड बागायत उभी करण्यापर्यंतचा पथदर्शी आराखडा दिवसभराच्या चर्चेतून तयार केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 2nd Test: 23 वर्षांनी पुन्हा तोच 'इतिहास'! शतक हुकले तरी साई सुदर्शनने केला मोठा कारनामा; दिल्लीत पुन्हा डावखुऱ्या फलंदाजाचा दबदबा VIDEO

National Coconut Conclave Goa: "नारळ - काजूची लागवड वाढवा"; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Viral Video: ट्रान्सफॉर्मर उतरवणाऱ्या 'भाई'चा जुगाड व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली मजा; म्हणाले, 'याला तर भारतरत्न द्या...'

Beef In Goa: गोव्यात बीफ बंद होणार? पर्यटन मंत्री रोहन खंवटेंनी स्पष्टच सांगितलं

'DIGITAL ARREST' चा भयानक खेळ! ED-सुप्रीम कोर्टाच्या बनावट नोटिसा पाठवायचे, 100 कोटींच्या सायबर प्रकरणी 4 अटकेत

SCROLL FOR NEXT