National Book Week Government Town Library Dainik Gomantak
गोवा

National Book Week : वाचनाने स्मरणशक्ती तल्लख बनते : सुलक्षणा सावंत

National Book Week : आमची भाषा सुधारण्यासाठी व स्मरणशक्ती तल्लख बनविण्यासाठी वाचन हे आवश्यक आहे, असे पद्मिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

National Book Week : साखळी आज डिजिटल माध्यमांच्या अतिक्रमणात विद्यार्थी पुस्तक वाचनापासून दूर जात आहे. परंतु आमची भाषा सुधारण्यासाठी व स्मरणशक्ती तल्लख बनविण्यासाठी वाचन हे आवश्यक आहे, असे पद्मिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत यांनी सांगितले.

साखळी येथील सरकारी नगर वाचनालयात राष्ट्रीय पुस्तक सप्ताहाचे नुकतेच उद्‍घाटन झाले. यावेळी केंद्रीय वाचनालयाच्या ग्रंथपाल सुलक्षा कोळमुळे, गजानन शेट्ये, साखळी वाचनालयाचे प्रमुख ब्रिजेश चणेकर यांची उपस्थिती होती.

यावेळी वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या पुस्तक वाचन स्पर्धेत पहिले बक्षीस श्रीरंग ताम्हणकर (के. ब. हेडगेवार विद्यामंदिर साखळी), दुसरे बक्षीस अक्षरा कुंभारजुवेकर (सेंट जॉन हायस्कूल साखळी) तर तिसरे बक्षीस वैष्णवी मराठे (गुरुदास गावस स्मृती हायस्कूल साखळी) यांना प्राप्त झाले.

सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम बक्षीस प्रोग्रेस हायस्कूल साखळी, दुसरे सेंट जॉन हायस्कूल साखळी व तिसरे के. बी. हेडगेवार विद्यामंदिर साखळी यांना तर उत्तेजनार्थ गोपाळकृष्ण हायस्कूल साखळी, गुरुदास गावस स्मृती हायस्कूल साखळी, महालक्ष्मी हायस्कूल कुडणे यांना बक्षीसे प्राप्त झाली. स्वागत ग्रंथपाल सुलक्षा कोळमुळे यांनी स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT