Nasnola panchayat garbage fine Dainik Gomantak
गोवा

उघड्यावर कचरा टाकल्यास 5 हजारांचा दंड, नास्नोळा पंचायत मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जागरूक नागरिकांना 10 हजारांचे बक्षीस

Nasnola panchayat: नास्नोळा पंचायत क्षेत्रात उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. गाडीचा नंबर किंवा कचरा फेकणाऱ्याची ओळख पटताच संबंधिताकडून पंचायतीमार्फत ५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: नास्नोळा पंचायत क्षेत्रात उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही. गाडीचा नंबर किंवा कचरा फेकणाऱ्याची ओळख पटताच संबंधिताकडून पंचायतीमार्फत ५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नास्नोळा पंचायत मंडळाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

गावातील कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी नास्नोळा ग्रामपंचायतीने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे.

कचरामुक्त आणि सुंदर गाव बनविण्याच्या उद्देशाने सरपंच लक्ष्मण केरकर आणि पंचायत मंडळाने मिळून विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारपासून आम्ही या मोहिमेला सुरुवात करत आहोत, अशी माहिती सरपंच केरकर यांनी दिली.

जागरूक नागरिकांना १० हजारांचे बक्षीस

पंचायतीने जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, जर कोणी नास्नोळा पंचायतीच्या हद्दीत कचरा फेकताना आढळला, आणि एखाद्याने त्याचा गाडी नंबर प्लेटसह फोटो किंवा व्हिडिओ काढून पंचायतीला पाठवला, तर माहिती देणाऱ्या जागरूक नागरिकाला १ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. या मोहिमेत जो नागरिक कचरा फेकणाऱ्यांचे सर्वाधिक फोटो काढून देईल, त्याला १० हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT