Nashamukt Yuva For Viksit Bharat Dainik Gomantak
गोवा

Nashamukt Yuva For Viksit Bharat: गोव्यात नशामुक्त युवा अभियानासाठी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक; ड्रगविरोधी लढा तीव्र

Drug Free Goa Campaign: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेअंतर्गत गोव्यात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेअंतर्गत गोव्यात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत : संकल्प अभियान’ राबविण्याची तयारी सुरू झाली आहे. अभियानाच्या प्रारंभापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व संबंधित विभागप्रमुख व विविध यंत्रणांच्या प्रतिनिधींसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.

बैठकीत अभियानाच्या नियोजनाचा आढावा घेत विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय राखून मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोव्याला ड्रग्‍समुक्त करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, व्यसनमुक्ती व पुनर्वसन तसेच कायद्याची कठोर अंमलबजावणी या चार घटकांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस, शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याण, युवकविषयक विभाग तसेच इतर सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने मिशन मोडमध्ये काम करावे. युवकांमध्ये जनजागृतीसाठी शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संघटना आणि समाजाच्या सक्रिय सहभागावरही मुख्‍यमंत्र्यांनी भर दिला.

युवकांमध्ये जागृती करण्‍यावर भर

सर्व विभागांनी मिशन मोडमध्ये समन्वयाने काम करावे. युवकांमध्ये जनजागृतीसाठी शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा सक्रिय सहभाग वाढवावा. अमलीपदार्थमुक्त गोवा घडविण्यासाठी ही मोहीम जनआंदोलन बनवावी, असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT