NASA Space Challenge Dainik Gomantak
गोवा

NASA Space Challenge: नासा स्पेस चॅलेंज! गोव्यातील 38 संघ सहभागी; ग्लोबल नासा हॅकेथॉन 2025 अंतर्गत पर्वरीत आयोजन

NASA Space Challenge Goa: ३८ संघांपैकी ४ संघ अंतिम ‘नासा हॅकेथॉन’मध्ये भाग घेण्यासाठी निवडले जातील. ३८ पैकी २८ संघांनी ऑफलाईन स्तरावर सहभाग नोंदवला तर १० संघांनी ऑनलाईन स्तरावरती सहभाग नोंदवला.

गोमन्तक डिजिटल टीम

पर्वरी: ‘नासा’ या संस्थेची अनेक मिशन्स कार्यरत आहेत, त्या मिशन्समधून जी माहिती येते, त्या माहितीचे विश्लेषण करून सद्य:स्थितीत निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्या माहितीचा उपयोग केला जातो. यावर आधारित जागतिक ‘नासा इंटरनॅशनल स्पेस ॲप्स चॅलेंज’चे आयोजन करण्यात येते.

उच्च शिक्षण संचालनालयाने गोवा राज्य उच्च शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने ५ रोजी आयोजित जगातील सर्वांत मोठे वार्षिक जागतिक दोन दिवसांचे हॅकेथॉन असलेले नासा इंटरनॅशनल स्पेस ॲप्स चॅलेंज उत्साहात पार पडले.

यामध्ये ३८ नोंदणीकृत संघांद्वारे २३० व्यक्तींनी सहभाग घेतला. हे संघ केवळ गोव्यातीलच नव्हे तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यांतील होते.

या ३८ संघांपैकी ४ संघ अंतिम जागतिक ‘नासा हॅकेथॉन’मध्ये भाग घेण्यासाठी निवडले जातील. ३८ पैकी २८ संघांनी ऑफलाईन स्तरावर सहभाग नोंदवला तर १० संघांनी ऑनलाईन स्तरावरती सहभाग नोंदवला.

३८ मधील १३ संघ हे अद्वितीय संस्थांमधून सहभागी झाले होते. ‘अ वर्ल्ड अवे : हॅटिंग फॉर एक्सोप्लोनेट्स विथ ए आय’ आणि ‘विल इट रेन ऑन माय परेड’ या विषयांमध्ये तीव्र स्पर्धा झाली.

या हॅकेथॉनमध्ये बीट्स-गोवा येथील कुणाल कोरगावकर, बोर्डा सरकारी महाविद्यालयातील नाझिया शेख, तसेच डॉन बास्को कॉलेज पणजी येथील व्यंकटेश गावकर, अल्विन अब्रांचेस यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात स्थानिक पातळीवरील जवाहर नवोदय विद्यालय वाळपई मधील ‘INDRA. G’ या संघाने ‘Will it rain on my Parde’ हा प्रकल्प सादर केला.

नासा इंटरनॅशनल स्पेस ॲप्स चॅलेंज हा जगातील सर्वात मोठा वार्षिक जागतिक हॅकेथॉन उपक्रम आहे, जो सहकार्य, सर्जनशीलता आणि समीक्षात्मक विचारांना प्रेरणा देतो. २०२४ मध्ये या कार्यक्रमात १६३ देशांमधील ९३,००० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला, १५,००० हून अधिक संघ तयार केले आणि जवळजवळ १०,००० प्रकल्प सादर केले.

विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी व्यासपीठ : विठ्ठल तिळवी

जागतिक नासा इंटरनॅशनल स्पेस चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या सहभागींचा उत्साह आणि समर्पण वर्तमानातील तरुण पिढीच्या तीव्र आकांक्षांचा पुरावा आहे. २०४७च्या आधीही विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Actress Sandhya: ए मालिक तेरे बंदे हम! भारतीय चित्रपटसृष्टीच्या महान पर्वाच्या साक्षीदार 'संध्या'

Punav Utsav: देव भगवतीच्या चव्हाट्यावर येतात, मंगलाष्टके म्हणून ‘शिवलग्न’ लावले जाते; पेडणेची प्रसिद्ध 'पुनाव'

Goa Agriculture: 'थोडा अभ्यास वाढवला, सरकारने सहकार्य केले तर गोव्यात मुबलक भाजीपाला पिकेल'; कृषी राजदूत 'वरद'चे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT