Supermoon 2025: आकाशातील अद्भुत क्षण! आज गोव्यातून दिसणार 'सुपरमून', कुठे किती वाजता पाहता येईल?

Harvest Moon in Goa: गोव्यातील आकाशप्रेमी आणि खगोलशास्त्र रसिकांसाठी आजची रात्र विशेष ठरणार आहे.
Supermoon 2025
Supermoon 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील आकाशप्रेमी आणि खगोलशास्त्र रसिकांसाठी आजची रात्र विशेष ठरणार आहे. ऑक्टोबर महिन्यातील सुपरमून मालिकेतील पहिला “हार्वेस्ट मून” आज मंगळवारी रात्री गोव्याच्या आकाशात झळकणार आहे. या महिन्यातील तीनही सुपरमूनपैकी हा पहिला आणि सर्वात तेजस्वी चंद्र असेल.

हा “हार्वेस्ट मून” वर्षातील सर्वात मोठा आणि प्रकाशमान चंद्र मानला जातो. पूर्वीच्या काळात शेतकरी आपल्या पिकांची कापणी करण्यासाठी या चंद्राच्या उजेडाचा उपयोग करत असत, म्हणूनच त्याला “हार्वेस्ट मून” असे नाव देण्यात आले आहे.

वैज्ञानिकांच्या मते, आज दिसणारा हा सुपरमून सामान्य पौर्णिमेपेक्षा जवळपास १४ टक्के मोठा आणि ३० टक्के अधिक तेजस्वी असेल. चंद्र क्षितिजावर उगवताना तो सोनसळी आणि नारिंगी छटांमध्ये दिसेल, ज्यामुळे आकाशाचा देखावा अधिक मोहक होणार आहे.

Supermoon 2025
Goa Road Repair: '..येत्‍या 15 दिवसांत रस्‍ते सुधारू'! CM सावंतांचे आश्‍‍वासन; खड्डेमय रस्‍त्‍यांवरून ‘आप’ आक्रमक

गोव्यातील आकाशप्रेमींना संध्याकाळी ६:४५ नंतरपासून रात्री ९ वाजेपर्यंत हा चंद्र सर्वाधिक तेजस्वी स्वरूपात पाहता येईल. स्वच्छ आकाश असल्यास पणजी, मडगाव, कळंगुट आणि मुरगाव या भागांतून त्याचे स्पष्ट दर्शन घेता येणार आहे.

या सुपरमून मालिकेतील पुढील दोन चंद्र अनुक्रमे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दिसणार आहेत.

  • नोव्हेंबरचा सुपरमून – त्रिपुरी पौर्णिमा व कार्तिक पौर्णिमा तसेच गुरु नानक जयंती सोबत साजरा होईल.

  • डिसेंबरचा सुपरमून – मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंतीच्या रात्री आकाशात झळकणार आहे.

Supermoon 2025
Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

गोव्यातील नागरिक आणि पर्यटकांसाठी पणजी येथील सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळेत आजच्या सुपरमूनसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत खुल्या आकाशाखाली दुर्बिणीद्वारे विशेष निरीक्षण केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com