narkasur goa restrictions Dainik Gomantak
गोवा

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

goa police narkasur timing: वाड्यांवर, घराघरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीसुद्धा नरकासुराचे दहन केले जाते, तसेच ठिकठिकाणी स्पर्धा आणि भव्य मिरवणुकांचे आयोजन केले

Akshata Chhatre

पणजी: संपूर्ण गोव्यात दिवाळीच्या काळात जर सर्वाधिक उत्साह कशाचा असतो, तर तो म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या नरकासुर दहनाचा. वाड्यांवर, घराघरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणीसुद्धा नरकासुराचे दहन केले जाते, तसेच ठिकठिकाणी स्पर्धा आणि भव्य मिरवणुकांचे आयोजन केले जाते.

मात्र, या स्पर्धा आणि मिरवणुकांमधून मोठ्या प्रमाणात होणारे ध्वनिप्रदूषण आणि रात्री उशिरापर्यंत वाजणारे कर्णकर्कश संगीत स्थानिकांसाठी मोठी समस्या ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर, गोवा पोलिसांनी रात्री १२ नंतर या प्रकारचे संगीत वाजवण्यावर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पोलीस आणि नरकासुर मंडळांची बैठक

हा निर्णय घेण्यापूर्वी गोवा पोलिसांनी नरकासुर दहन मंडळांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत ध्वनी मर्यादेच्या नियमांचे पालन करण्याबाबत मंडळांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. रात्री १२ नंतर शांतता राखण्याच्या उद्देशाने हा निर्बंध जारी करण्यात आला आहे.

काही मंडळांकडून या निर्णयाला विरोध झाला असला तरी, पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई) करण्याचे निर्देश जारी केले आहेत. उत्सवाच्या उत्साहात नागरिकांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोव्याच्या या आगळ्यावेगळ्या दिवाळी उत्सवाचा आनंद नियमांमधून आणि शांततेत साजरा व्हावा, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'...म्हणून गोवा सोडलं', आयोजकांनी पहिल्यांदाच सांगितलं IBW हलवण्याचं कारण; नेमका गोंधळ काय?

रानडुक्कर समजून झाडलेली गोळी मित्राला लागली; सावंतवाडीच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Opinion: भारताला उंच पुतळ्यांत नव्हे, तर एकेकाळी जगाला आपल्याकडे आदराने व कुतूहलाने पाहायला लावणाऱ्या गूढतेत शोधणे आवश्यक आहे..

Goa Live News: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाळीतून सुंदर नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांचे जबरदस्त शक्तीप्रदर्शन

Ind Vs SA: भारत आफ्रिका सामन्यापूर्वी मोठी बातमी! 2 खेळाडू दुखापतग्रस्त; 'वॉशिंग्टन'लाही डच्चू? पंत, तिलकवरती नजर

SCROLL FOR NEXT