Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Mini Narkasur in Goa: लहान रस्त्यांवरील स्टॉल्स आणि स्थानिक कलाकारांनी तयार केलेले हे छोटे नरकासुर पुतळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत
Mini Narkasur Sale in Goa
Mini Narkasur Sale in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिवाळीचा सण जवळ आल्याने गोव्यात ठिकठिकाणी सध्या उत्साहाचे वातावरण आहे. गोव्यातील दिवाळी म्हटलं की ती नरकासुर दहनाशिवाय अपूर्ण आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे या नरकासूरचे दहन करून सणाची सुरुवात होते. यंदाच्या दिवाळीत 'मिनी नरकासुर' पुतळ्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. लहान रस्त्यांवरील स्टॉल्स आणि स्थानिक कलाकारांनी तयार केलेले हे छोटे नरकासुर पुतळे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

साधारणपणे ३०० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत या छोट्या नरकासुर प्रतिमांची विक्री होत आहे. तरुण वर्ग आणि लहान मुलांमध्ये या 'मिनी नरकासुरांची' क्रेझ दिसत आहे, कारण ते आपल्या घराबाहेर किंवा सोसायटीमध्ये नरकासुराचे दहन करण्याची परंपरा जपण्यासाठी ते खरेदी करत आहेत. मोठे नरकासुर पुतळे बनवण्यासाठी वेळ आणि जागा जास्त लागत असल्याने, लगेच घेऊन जाता येणाऱ्या या छोट्या प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. घराघरांमध्ये या नरकासुरांचे दहन करून, वाईटावर प्रहार करून दिवाळी सुरु होईल.

Mini Narkasur Sale in Goa
Narkasur in Goa: 20 फुट उंच, अक्राळ-विक्राळ डोळ्यांचा महाकाय! जगात सापडणार नाही असा अनुभव; कुठे बघाल 'नरकासुर दहनाचा' थरार?

गोव्यात नरकासुराचे महत्त्व काय?

भारतातील इतर राज्यांमध्ये जिथे दिवाळीचा मुख्य दिवस लक्ष्मीपूजन किंवा राम वनवासातून अयोध्येला परतण्याचा आनंद म्हणून साजरा केला जातो, तिथे गोव्यात 'नरक चतुर्दशी' या दिवसाला सर्वाधिक महत्त्व आहे. नरकासुर पुतळ्याच्या दहनामुळे गोव्याच्या दिवाळीला एक खास आणि अनोखी ओळख मिळाली आहे.

नरकासुराच्या परंपरेचे महत्त्व:

वाईटावर चांगल्याचा विजय: नरकासुर दहनाची प्रथा म्हणजे अन्याय आणि अत्याचाराचे प्रतीक असलेल्या नरकासुरावर भगवान श्रीकृष्णाने मिळवलेल्या विजयाचे स्मरण करणे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुराचे दहन केले जाते, हे वाईट प्रवृत्ती आणि अंधाराचा नाश झाल्याचे प्रतीक आहे.

पौराणिक महत्व: पौराणिक कथेनुसार, नरकासुर हा क्रूर राक्षस होता. त्याने १६,००० स्त्रियांचे अपहरण केले होते आणि त्याचा वध श्रीकृष्णाने त्याची पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने केला. त्यामुळे गोव्याच्या स्थानिक सांस्कृतिक आणि पौराणिक अस्मितेत नरकासुर वधाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

कला आणि एकतेचे प्रदर्शन: दिवाळीच्या अनेक आठवडे आधीपासून तरुण मंडळी आणि कला गट बांबू, गवत आणि कागद वापरून भव्य नरकासुर पुतळे बनवण्याची तयारी सुरू करतात. यातून त्यांची कलात्मकता आणि सामाजिक ऐक्य दिसून येते. अनेक ठिकाणी या पुतळ्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात.

दिवाळीची सुरुवात: गोव्यात या नरकासुर दहनानेच दिवाळीच्या मुख्य उत्सवाला सुरुवात होते, त्यानंतर अभ्यंग स्नान आणि पोह्यांचे विविध पदार्थ खाऊन सण साजरा केला जातो. गोव्यातील ही अनोखी परंपरा देश-विदेशातील पर्यटकांनाही आकर्षित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com