Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

Narendra Modi: 'पंतप्रधान मोदींमुळे गोव्‍याचा सर्वांगीण विकास'! दामू नाईकांचे गौरवोद्गार; 8931 दिवस पूर्ण केल्‍याबद्दल केले अभिनंदन

Damu Naik: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्‍हणून ८,९३१ दिवस पूर्ण केल्‍याच्‍या निमित्ताने भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्‍हणून ८,९३१ दिवस पूर्ण केल्‍याच्‍या निमित्ताने भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.

देशाचे नेतृत्व करताना पंतप्रधानपदाचे ८,९३१ दिवस पूर्ण करताना पंतप्रधान मोदींनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्‍यात अर्थव्यवस्थेला एका सूत्रात गुंफणारी ‘जीएसटी’ प्रणाली, कलम ३७० ची समाप्ती, अयोध्येतील राम मंदिर, रस्ते, रेल्वे, बंदरे आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार, भारताची हरित-ऊर्जेच्या क्षेत्रातील मोठी झेप आदींसारख्‍या अनेक निर्णयांचा समावेश आहे.

मोदींच्‍या कल्याणकारी आणि सुरक्षाविषयक सुधारणांमुळे केवळ आश्वासने न राहता त्यांची गोव्‍यासह देशभरात प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे, असे नाईक यांनी जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे. पंतप्रधान मोदींनी गोव्‍याच्‍या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्रोत्‍साहन दिले. त्‍यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली.

त्‍यामुळे राज्‍यातील पायाभूत सुविधांचा गेल्‍या काही काही वर्षांत झपाट्याने विकास झाला आहे. पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली असून, त्‍यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण झाल्या आहेत. अलीकडील स्थानिक निवडणुकांचे निकाल याच विश्वासाचे प्रतिबिंब आहे, असेही दामू नाईक यांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT