पणजी: गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान या नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासास २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रदेश भाजपनेही देशभरात सेवा ज्योती यात्रेचे आयोजन करीत गुरुवारी मोटारसायकल रॅली काढल्या.
या निमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सर्वच मंत्री आणि भाजप आमदारांनी आपापल्या मतदारसंघांत कार्यकर्त्यांसह सेवा ज्योती यात्रेचे जंगी आयोजन करीत येत्या विधानसभा निवडणुकीचे शक्तीप्रदर्शन केले.
सेवा ज्योती यात्रेतील मुख्य कार्यक्रम केपे, म्हापसा आणि चिखली येथे आयोजित करण्यात आले. केपेतील कार्यक्रमाला भाजपच्या गोवा प्रभारी डॉ. भारती पवार आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, म्हापशातील कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, तर चिखलीतील कार्यक्रमात मंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते. विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना आणि त्यातच प्रदेश काँग्रेसने भाजप सरकारविरोधात गोवा राखण यात्रा सुरू केलेली असल्याने भाजपच्या सेवा ज्योती यात्रेला महत्त्व प्राप्त झालेले होते.
त्यानुसार भाजपने प्रत्येक मतदारसंघातील तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून या यात्रेद्वारे विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्ष मैदानातील तयारी सुरू केल्याचा संदेश विरोधी पक्षांना दिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह इतर मंत्री, आमदारांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह यात्रेत उतरून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. निवडणुकीला सामोरे जात असताना यात्रेच्या माध्यमातून पुढील तीन महिने आपापल्या मतदारसंघांतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून भाजप सरकारने केलेली कामे जनतेसमोर ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
विरोधकांना पुन्हा धोबीपछाड देण्यासाठी रणनीती
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने राज्यात गोवा राखण यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत होणाऱ्या आरोपांना विकासातून उत्तर देण्यासाठी भाजप नेतेही सरसावले आहेत.
विरोधकांना धोबीपछाड देण्यासाठी भाजपच्या डबल इंजिन सरकारने गेल्या बारा वर्षांत राज्याचा केला सर्वांगीण विकास, उभारलेले प्रकल्प तसेच सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा निवडणुकीत लाभ उठवण्याची रणनीती आखली असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
पुढील कालावधीत केलेली कामे प्रत्येक मतदारसंघात पोहोचवली जातील. दरम्यान, बुधवारी भाजपच्या मंत्र्यांनी आपआपल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने यात्रा काढून आपली ताकद दाखवली.
राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणू : मुख्यमंत्री : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरातपासून ते अखंड भारताच्या सेवेपर्यंतचा २५ वर्षांचा प्रवास हा प्रत्येक नागरिकाच्या हृदयाला भिडणारा आणि अथांग कष्टांनी भरलेला आहे. ‘देश प्रथम’ ही भावना उराशी बाळगून त्यांनी अहोरात्र काम केले असून, स्वतःच्या प्रत्येक यशाचे श्रेय त्यांनी देशातील जनता आणि कार्यकर्त्यांना दिले आहे. गोव्यातही गेल्या १५ वर्षांत सलग सत्तेच्या माध्यमातून झालेले परिवर्तन हे कार्यकर्त्यांच्या याच निःस्वार्थ कष्टांचे फलित असून, मोदींच्या ‘येस, व्ही विल डू इट’ या संकल्पासह २०२७ मध्ये पुन्हा एकदा गोव्यात डबल इंजिन सरकार आणू’’, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
विकासाची गती कायम ठेवूया: ‘‘देशाच्या विकासासोबतच केंद्रातील भाजप सरकारकडून गोव्याचाही सर्वांगीण विकास होत आहे. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे’’, असे आवाहन गोवा प्रभारी डॉ. भारती पवार यांनी केपे येथील कार्यक्रमात बोलताना केले. तर, ‘‘गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि देशाचे पंतप्रधान म्हणून १२ वर्षे काम करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.