Chhatrapati Shivaji Maharaj Dainik Gomantak
गोवा

नारायण बांदेकर: सर्व घटकांच्या हितासाठी हिंदू समाज कार्यरत

'मायमोळेत स्मशानभूमी दुरुस्तीसह विविध कामे'

दैनिक गोमन्तक

वास्को: सर्व घटकांना एकत्र करून समाजासाठी काहीतरी करावे या भावनेतून मुरगांव हिंदू समाज कार्यरत असल्याचे प्रतिपादन उद्योगपती तथा समाजाचे अध्यक्ष नारायण बांदेकर यांनी केले. समाजातर्फे सुमारे 11 लाख रुपये खर्च करून हिंदू स्मशानभूमीची दुरूस्ती करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर मायमोळे येथील राखीव जागा लीजवर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे,असेही ते म्हणाले. येथील हॉटेल एच. क्यू. मध्ये घेण्यात आलेल्या आमसभेच्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर समाजचे उपाध्यक्ष शेखर खडपकर, सचिव संतोष , सहसचिव शैलेंद्र , खजिनदार प्रताप गावकर व सह खजिनदार दामू कोचरेकर उपस्थित होते.

बांदेकर म्हणाले, की समाजातर्फे लहान मुलांकरिता संगीत प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. चिखली येथे सुमारे पंधरा लाख रुपये खर्चून भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली 6 जून रोजी त्याचे अनावरण होत आहे.

मुरगांव हिंदू समाज ही संस्था फार जुनी असली तरी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत अनेक नवीन उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. समाजाच्या सर्व सभासदांनी दाखवून दिलेल्या विश्वासामुळे अनेक गोष्टी साध्य करणे शक्य झालेले आहे. कुठलाही उपक्रम पुढे घेऊन जाताना समाजाची आर्थिक स्थिती भक्कम असावी लागते याचा विचार करून प्रत्येक सदस्यांनी सकारात्मक विचार करून पुढे येण्याचे आवाहन बांदेकर यांनी केले.

सह खजिनदार दामू कोचरेकर यांनी जमाखर्च सादर केल्यानंतर त्याला सर्वानुमते संमती देण्यात आली. त्या पूर्वी मागील आमसभेच्या इतिवृतांताला मान्यता देण्यात आली.

यावेळी सचिव खोर्जुवेकर यांनी बिनविरोध निवडून आलेल्या कार्यकारणी वरील सभासदांची नावे वाचून दाखविली. प्रारंभी हयात नसलेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यंदाच्या नव्या सभासदांचे अध्यक्षांच्या हस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. उपाध्यक्ष शेखर खडपकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT