डिचोली: संगीत कलेला मोठी परंपरा आणि प्रचंड शक्ती आहे. संगीत आपले दु:ख विसरायला लावते. मनावरील ताणतणाव दूर करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासही मदत संगीतातून होते. संगीत कलेची प्रामाणिकपणे सेवा केल्यास या कलेचा सन्मान होतो. असे प्रतिपादन जवळपास 40 वर्षे संगीत क्षेत्रात योगदान दिलेले ज्येष्ठ संगीतकार तथा निवृत्त शिक्षक नरसिंह कृष्ण गोवेकर यांनी केले. डिचोली सम्राट क्लबतर्फे सत्कार केल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात गुरुवर्य श्री. गोवेकर यांचा डिचोली सम्राट क्लबचे अध्यक्ष सम्राट गुरुदास कोरगांवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम देवी सरस्वती तसेच गुरू कै. माडये गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरूवात झाली. श्री नरसिंह कृष्ण गोवेकर यांचा शिष्यवर्गाने गुरू पुजन केले. कु.कल्याणी जयेश परब हीने गुरुपौर्णिमेची महती कथन केली गेली.
या कार्यक्रमात कु. श्रुती जयेंद्र गोवेकर हीने राग " बिलावल " सादर केला तर भारत चणेकर यानी "राग अहीर भैरव " सादर केला. त्यांच्याबरोबर सुरेंद्र गोवेकर (हार्मोनियम) आणि जयेंद्र गोवेकर ( तबला) यांनी संगीतसाथ दिली तसेच या कार्यक्रमाचे निवेदन यदुनाथ शिरोडकर यांनी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.