पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील भाजप (BJP) सरकार राज्याचे हित जपण्यास आणि गोमंतकियांचे रक्षण करण्यास अपुरे पडले आहे. कोविड महामारीच्या (Covid19 Pandemic) जोडीला राज्यशासनाच्या गैरनियोजनामुळे राज्याची एकूण झालेली आर्थिक विपन्नावस्था, राज्यात कायदा सुव्यवस्थेला फासलेला हरताळ, राज्यामध्ये सध्यस्थितीत पर्यावरण, जंगले, वन्यजीव आणि एकूण गोव्याच्या हितालाच निर्माण झालेला धोका यामुळे जनतेच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले. त्यामुळे गोवा सरकार त्वरित बरखास्त करावे अशी आग्रही मागणी आज कॉंग्रेस शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. (Goa Congress Committee met the Governor of Goa)
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन राज्यासंदर्भातील विविध मुद्यांचा उहापोह करणारी दोन निवेदने सादर केली, तसेच मोदी सरकारच्या आशीर्वादाने झालेल्या 'पिगॅसस हेरगिरी'ची चौकशी करण्याची मागणी राज्यपालांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींकडे केली. राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेस सरचिटणीस आग्नेलो फर्नाडिस, महिला काँग्रेस अध्यक्षा बिना नाईक, युवा काँग्रेस अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, आदींचा समावेश होता.
गोव्यातील पूरग्रस्त भागाचा राज्यपालांनी ताबडतोब दौरा करावा
गोव्याची अस्मिता सांभाळण्यासाठी तसेच गोमंतकीयांचे कश्ट कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी आम्ही राज्यपालांकडे केल्याचे दिगंबर कामत यांनी सांगितले. गोव्याचे राज्यपाल म्हणून राज्याच्या घटना प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल पक्षाच्यावतीने आणि जनतेच्या वतीने श्रीधरन पिल्लई याना काँग्रेसकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
कॉंग्रेस पक्षाने राज्यपालांना देण्यात आलेल्या नऊ पानी निवेदनामध्ये प्रामुख्याने ढासळलेली अर्थव्यवस्था, असंवेदशीलतेने हाताळलेली कोविड परिस्थिती, पर्यावरणाचा मुद्दा, ऐरणीवर आलेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्यात सरकारचे अपयश, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अपयश, भ्रष्टाचार, अर्थहीन प्रशासकीय कारभार, आणि भाजप सरकारने केलेला लोकशाहीचा खून यावर प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे. अशी माहिती चोडणकर यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.