Narakasurvadha competition  Dainik Gomantak
गोवा

Narakasurvadha Competition : मुरगाव हिंदू समाजतर्फे आज नरकासुरवध स्पर्धा

गोमन्तक डिजिटल टीम

Narakasurvadha competition : वास्को : मुरगाव हिंदू समाज ‘श्री महालक्ष्मी पूजनोत्सव’ दिवाळी निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवार, ११ ते दि.१८ नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमानुसार साजरा करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत अध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सांगितले.

यावेळी त्याच्या समवेत उपाध्यक्ष नीळकंठ देसाई , तुळसीदास फळदेसाई, सचिव रितू आरोलकर , खजिनदार प्रभाकर मुळीक, सहखजिनदार यादवेश घोंगे उपस्थित होते.

शनिवारी रात्री ८ वाजल्या पासून वास्को, रेल्वे स्थानका समोरील जोशी चौकांत मुरगांव तालुका मर्यादित ‘नरकासूर वध’ व ‘आकाश कंदील’स्पर्धा.नरकासुर वध स्पर्धेत अनुक्रमे रु.५५५५५, ३३३३३, २२२२२ तर तीन उत्तेजनार्थ प्रत्येकी ७७७७. उत्कृष्ट श्रीकृष्ण २५०० रुपये ठेवण्यात आले आहे.

रविवारी संध्याकाळी ४.३० वा. धर्मशाळा येथून ढोल ताशे पथकासह श्रींच्या भव्य मिरवणुकीला प्रारंभ व संध्याकाळी ७ वाजता धर्मशाळा वास्को येथे उभारलेल्या महालक्ष्मी मंडपात, समितीचे अध्यक्ष नंदादीप व प्रिया राऊत यांच्या यजमानपदाखाली श्रींची प्रतिष्ठापना होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT