Nanus Sport Ground Dainik Gomantak
गोवा

Nanus Sport Ground : विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नांना यश; खेळाडूंना मिळणार अत्याधुनिक क्रीडांगण

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरीचा विकास झपाट्याने होत आहे. त्यात आता गेल्या तीन दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हातवाडा - नाणूस, वाळपई येथील क्रीडांगणाच्या विकासकामाला सुरवात झाली आहे. ८ कोटी २८ लाख रुपये खर्चाच्या या क्रीडांगणावर विविध क्रीडा सुविधा उपलब्ध होणार असून या परिसरातील ॲथलेटिक्स उपक्रमांसाठी आवश्यक जागा उपलब्ध होणार आहे. गोवा स्टेट अर्बन डेव्हलपमेंट एजन्सीने (जीसुडा) सुरू केलेला हा प्रकल्प दुसऱ्या टप्प्यात आला असून हा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी निविदा काढण्यात येत आहेत.

वाळपईच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये असलेल्या हातवाडा येथील हे मैदान क्रीडा प्रकारांचे केंद्र बनले असून शेकडो तरुण व शाळकरी मुलांची वर्दळ असते. हा महत्त्वाचा प्रकल्प असूनही अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. काही कामे अधूनमधून सुरू होऊन तो रखडला होता. मात्र, आमदार विश्वजीत राणे यांच्या प्रयत्नांमुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून वाळपईवासीय आनंदीत झाले आहेत.

दरम्यान, तरुणांचे क्रीडागुण जोपासण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी परिपूर्ण फुटबॉल मैदानाचीही आवश्यक आहे. या प्रस्तावाचाही फेरविचार करून प्रस्तावित ७-ए-साईड फुटबॉल मैदानाव्यतिरिक्त १२-ए-साईड फुटबॉल मैदानाचा विकास आराखड्यात समावेश करावा, अशी विनंती फुटबॉलप्रेमींनी आमदार विश्वजीत राणे यांच्याकडे केली आहे.

हातवाडा क्रीडांगणाच्या विकासकामांना सुरवात झाल्याने वाळपईतील क्रीडा संकुलात नवी उमेद निर्माण झाली आहे. सध्या मैदानाच्या सपाटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे टप्याटप्याने इतर कामे हाती घेतली जाणार आहेत.

क्रीडाप्रेमींत उत्साह

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मैदानाचे काम अखेर हाती घेण्यात आल्याने येथे खेळण्यासाठी येणारे खेळाडू उत्साहित झाले आहे. वाळपई नगरपालिका मैदान, मासोर्डे फुटसाल मैदान व आता नाणूस येथील मैदान होत असल्याने क्रीडाप्रेमींना आपली क्षमता दाखविण्याची संधी प्राप्त होणार आहे.

मैदानामुळे शहराचा दर्जा वाढणार : राणे

वाळपईत विकासकामांचा प्रवाह चालूच राहणार आहे. हे अत्याधुनिक मैदान वाळपई भागात होत असल्याने या मैदानाचा दर्जा वाढून त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. केंद्र सरकारवर आपला पूर्ण विश्वास आहे. अनेक वर्षांचा प्रलंबित प्रकल्प सत्तरीत मार्गी लागत आहे. नाणूस येथील या मैदानाच्या कामासाठी सोळा वर्षे प्रयत्न केले. आता हे काम लवकर पूर्ण करण्याचा मनोदय आहे, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

वाळपई शहराचा विकास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यामुळेच होत आहे. नाणूस येथे होऊ घातलेला हा मैदानाचा प्रकल्प सुरू करून राणे यांनी खेळाडूंना नवी संधी दिली आहे. कित्येक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला होता. मात्र, राणे यांनी अखेर प्रयत्न करून तो मार्गी लावला आहे. यामुळे सत्तरीतील तमाम खेळाडूंच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. या क्रीडा प्रकल्प काम मार्गी लावल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांचे आम्ही वाळपईकर आभारी आहोत.

इद्रुस शेख, उपनगराध्यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

Goa Taxi: ..हे तर सरकारचे कारस्थान! जीएसटी नोटीसींवरुन टॅक्सीमालक नाराज

Goa University: विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव! गोवा फॉरवर्डचा हल्लाबोल; शिष्‍टमंडळाशी चर्चा होणार

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

SCROLL FOR NEXT