Tree Uprooted in Aldona: हळदोण्यात कार अन् वीजांवर कोसळले झाड; 5 लाखांचे नुकसान

झाड विजेंच्या तारांवरही कोसळल्याने भागात काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता
Tree Uprooted in Aldona
Tree Uprooted in AldonaDainik Gomantak

Tree Uprooted in Aldona: पावसामुळे पडझडीच्या घटना वाढल्या असून यामुळे अनेक बातम्या समोर येत आहेत. यामध्ये मोठमोठी झाडे गाड्या आणि रस्त्यांवर पडण्याच्या घटना समोर येत आहेत. हळदोण्यातही असाच प्रकार समोर आला आहे.

Tree Uprooted in Aldona
Terekhol River Goa : नदीपात्रानजीकचा भराव खचतोय; तातडीने पाऊल उचलण्याची स्थानिकांची मागणी

मुसळधार पावसामुळे हळदोणा येथे आंब्याचे झाड उन्मळून I20 कारवर पडले. यामुळे कारचे तर नुकसान झालेच; शिवाय हे झाड विजेंच्या तारांवरही कोसळल्याने भागात काही काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावण्यात आले. जवानांनी गाडीवर पडलेले झाड हटवून रस्ता मोकळा केला आणि कार, विद्युत तारादेखील रस्त्यावरून हटवल्या. या घटनेत एकूण 5 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com