Mid-day Meal: निविदा उघडल्या, आता छाननी बाकी

शिक्षण संचालक: अद्याप कोणावरही शिक्कामोर्तब नाही
Mid-Day Meal
Mid-Day Meal Dainik Gomantak
Published on
Updated on

Mid-Day Meal माधान्ह आहार पुरविण्यासाठी आलेल्या पाच निविदा उघडल्या गेल्या असल्या, तरी अद्याप त्यांची छाननी झालेली नाही. आणखी एक किंवा दोन आठवडे छाननीसाठी लागण्याची शक्यता आहे.

त्यानंतरच कोणती संस्था माध्यान्ह आहार पुरविण्यासाठी पात्र आहे हे निश्‍चित होईल, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

पाच हजार विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविण्यासाठी काढलेल्या जाहिरातीनुसार पाच कंपन्यांनी निविदा भरल्या आणि त्या खुल्याही झाल्या, परंतु त्यापैकी कोणत्याही कंपनीला तो ठेका दिला गेला नाही, असे त्यांनी सांगितले.

निविदा सादर करणाऱ्या संस्थांमध्ये अक्षय पात्रा फाउंडेशन (बंगळुरू), स्त्री शक्ती केंद्र, घनश्‍याम सेवा समिती (दिल्ली), केंद्रीय भांडार (मुंबई) व नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स यांचा समावेश आहे.

Mid-Day Meal
Mahadayi Water Dispute: म्हादईप्रकरणीच्या हस्तक्षेप याचिकेत 71 पानी प्रतिज्ञापत्र

प्रत्येक संस्थांनी निविदा सादर करताना सुमारे २५० ते ३०० पाने जोडली आहेत. त्यांच्या कादपत्रांची छाननी झालेली नाही, परंतु त्यांच्या कामाच्या सादरीकरणासाठी शिक्षण खात्याने तारीख ठरवलेली होती, त्या तारखेला अक्षय पात्रा आणि स्त्री शक्ती या दोनच संस्थांनी सादरीकरण केले.

त्यामुळे पाचही संस्थांनी ठेवलेल्या गुणांपैकी इतर तीन संस्थांचे प्रत्येकी २० गुण कमी होतील, परंतु उर्वरित ८० गुण त्यांनी सादरीकरण केलेल्या कागदपत्रांतून मिळवूही शकतात, असे झिंगडे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com