Goa Monsoon Update 2023: पावसाचा जोर कायम; लाखाे रुपयांच्या हानीसह जनजीवन विस्कळीत

मुसळधार : 18 ठिकाणी पडझड ; वाहनांचेही नुकसान; वाहतूक मंदावली
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Update 2023 उत्तर, वायव्य अरबी समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याला रविवारी मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.

पावसामुळे पडझड सुरूच आहे. पेडणे, म्हापसा परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वाहिन्यांवर झाडे पडून बराच वेळ वीज खंडित झाली.

ठिकठिकाणी झाडे व फांद्या रस्ते, वीजतारांवर पडण्याचे अनेक प्रकार घडले. अग्निशमन दलाकडे रविवारी दिवसभरात १८ ठिकाणी पडझडीच्या नोंदी झाल्या. डिचोली, वेर्णा येथे झाडे पडून लाखाे रुपयांचे नुकसान झाले तर ७० हजारांची मालमत्ता वाचवण्यात आली.

अनेक ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे दलाच्या जवानांनी हटवून रस्ता मोकळा केला. करंझाळे येथील पेट्रोल पंपजवळ सकाळी झाड पडले. कुचेली - म्हापसा येथील पेट्रोल पंपजवळ भेंडीच्या झाडाची फांदी मोडून लोंबकळत होती, ती हटवण्यात आली.

वाहने, दुकानांचे नुकसान

वेरे येथे कृष्ण मंदिराशेजारी गाडी व शेडवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. पिळर्ण येथे फलोत्पादन केंद्रावर झाडाची फांदी पडल्याने गाडी व शेडचे नुकसान झाले.

करमणे येथे रस्त्यावर झाड पडले. आज सुट्टीचा दिवस असल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनेच्या ठिकाणी त्वरित पोहचून रस्त्यावरील तसेच घरावर पडलेली झाडे बाजूला करत होते.

बँकेच्या स्टोअर रूमची हानी

कोनशी-निरंकाळ येथे झाड रस्त्यावर पडले. तळावली येथील महालक्ष्मी शाळेजवळ आंब्याचे झाड विजेच्या तारांवर पडले. त्यामुळे या भागात दिवसभर वीज खंडित झाली. कुठ्ठाळ्ळी येथे बँक ऑफ बडोदा शाखेवर झाड पडून स्टोअर रूमचे ९० हजारांचे नुकसान झाले.

उतोर्डा येथे क्रीडा संकुलाच्या रूमवर झाडे पडून ५ हजारांचे नुकसान झाले. नेरूल येथे आंब्याचे झाड रस्त्यावर पडून वाहतूकीसाठी काही काळ बंद झाली. जवानांनी तो रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिला.

Goa Monsoon Update
तांबडी सुर्ल धबधबा ट्रेकिंग मोहिमेची पहिली बॅच रवाना; गोवा पर्यटन विकास महामंडळाचे आयोजन

अनेक ठिकाणी वीज गुल

गेल्या १५ दिवसांत (१८ जून ते २ जुलै) ४९१ कॉल्स आले. त्यामध्ये ५१ लाखांचे नुकसान झाले तर १ कोटी ५ लाखांची मालमत्ता वाचवण्यात आली.

अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. दुर्गावाडी-ताळगाव येथे दुपारी ३ वाजता वाहिन्यांवर माड पडून वीजपुरवठा खंडित झाला. हे झाड हटवून रात्री आठ वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

वाहतूक मंदावली

डिचोली येथे तीन ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. मठवाडा-पिळगाव येथे घरावर झाड पडून २० हजारांचे नुकसान झाले.

साखळी येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत घरावर झाड पडले. मये-डिचोली येथे रस्त्यावर आंब्याचे झाड पडून वाहतूक विस्कळीत झाली. जवानांनी हे झाड तोडून बाजूला केले व रस्ता मोकळा केला.

Goa Monsoon Update
Margao Fire News : दवर्लीत फर्नीचरच्या दुकानाला भीषण आग; 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण

आसगावात तळीत बुडून युवकाचा मृत्यू

आसगाव येथील बारा साखळेश्वर देवस्थान परिसरातील तळीत काही युवक आंघोळीसाठी उतरले होते. पैकी अँथनी फर्नांडिस (२१, रा. गिरी) हा बुडून मृत पावला. ही घटना रविवारी सायंकाळी ७ वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.

हणजूण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविला. याबाबत पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी माहिती दिली.

Goa Monsoon Update
Hit And Run Case : पाठीमागून आला आणि धडक देवून पसार झाला; अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

बाणावलीत पाणी

मडगाव - सासष्टी तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाणावली तळेबांध येथील तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. आजूबाजूच्या परिसरात अनेक घरे आहेत. अशाच जोराने पाऊस पडत राहिल्यास येथील घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे.

वीज खात्याची हानी

वाडे-वास्को येथे जंगली झाड रस्त्यावर पडले तसेच एफओसी जंक्शन येथे झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या. फोंडा येथे झाडे पडण्याच्या चार घटना घडल्या.

शिरोडा येथील प्राथमिक शाळेजवळ विजेच्या तारांवर फणसाचे झाड पडले. खांडेपार येथील शांतादुर्गा देवळाजवळ विजेच्या तारांवर झाड पडले. यात वीज खात्याचे बरेच नुकसान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com