Goa congress Dainik Gomanatk
गोवा

Goa Politics: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही गोव्याचा समावेश नाहीच

Goa Politics: चार राज्यांतील 45 उमेदवारांची नावे जाहीर

दैनिक गोमन्तक

Goa Politics:

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या उमेदवारांच्या यादीतही गोव्यातील उमेदवारांच्या नावांचा समावेश नसल्याचे दिसून आले. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर आज चार राज्यांतील 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली.

मागील आठवड्यात 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याच्या उमेदवारांची नावे पुढील यादीत येतील, अशी आशा होती.

एकूण 84 उमेदवार जाहीर: काँग्रेसचे आतापर्यंत 84 उमेदवार जाहीर झाले आहेत. मंगळवारच्या यादीत आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दमण-दीव येथील लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे.

गोव्यातील दोन्ही जागा आम्हीच जिंकणार, असे जरी स्थानिक नेते छातीठोकपणे सांगत असले, तरी केंद्रातील संसदीय समितीने या जागेवरील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. भाजपने काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, याकडे लक्ष ठेवूनच आपला उमेदवार जाहीर करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावल्याची चर्चा आहे.

त्यामुळेच कदाचित महिला उमेदवारांची नावे पाठवा, असे सांगितले असले तरी अजूनही प्रदेश भाजपने नावे पाठविली नाहीत, यावरून काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव भाजपला महत्त्वाचे वाटत असावे, हे स्पष्ट आहे.

काँग्रेसनेही अत्यंत सावध भूमिका घेत गोव्यातील नावे जाहीर करण्यास वेळ घेण्याचे ठरविल्याचे दिसते. उत्तरेत भाजप मजबूत आहे, तर दक्षिणेत काँग्रेस मजबूत आहे, यावरूनच काँग्रेस भाजप कोणाला उमेदवारी देते हे पाहात असावे. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाने जरी उमेदवार जाहीर केले असले तरी ते किती प्रभावी ठरतील, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

राहुल वायनाडमधून

घोषित केलेल्या यादीत 15 खुल्या प्रवर्गातील, 3 महिला तर 24 हे अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वायनाड याच मतदारसंघाला पसंती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco police: सजग पोलिसांमुळे गोवा सुरक्षित! कृष्णा साळकरांची स्तुतीसुमने; वास्को स्थानकात कामगिरीचे कौतुक

Sattari: सत्तरीला मॉडर्न बनवायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही! विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन; नगरगावात प्रचाराला प्रारंभ

गोव्याची 'शिखा' थायलंडमध्ये! साऊथईस्ट एशियन गेम्ससाठी Referee म्हणून निवड

Goa ZP Election: सासष्टीत भाजपकडून 3 च उमेदवार! 6 जागांवर अपक्षांना पाठिंबा; दक्षिण गोव्यात लढवणार 18 जागा

Goa Live News: होंडा येथे चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; चालक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT