Nakerim Betul Blast Protest Dainik Gomantak
गोवा

Nakerim Betul Blast: ‘त्या’ कंपनीवर कारवाई करा! नाकेरी-बेतुल स्फोट प्रकरणी स्थानिक आक्रमक; जिल्हाधिकारी संकुलावर काढला मोर्चा

Nakerim Betul Blast Protest: काही दिवसांपूर्वी साठवून ठेवलेल्या दारूगोळ्यामुळे रात्रीच्या वेळी भयंकर मोठा स्फोट झाला होता व आग लागण्याची घटना घडली होती.

Sameer Panditrao

सासष्टी: नाकेरी-बेतुल येथील नागरिकांनी शुक्रवारी (ता.४) जिल्हाधिकारी प्रशासन संकुलात मूक मोर्चा नेत तेथील दारूगोळा उत्पादन करणारी ह्युजेस प्रेसिजन मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेड लिमिटेड कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

काही दिवसांपूर्वी साठवून ठेवलेल्या दारूगोळ्यामुळे रात्रीच्या वेळी भयंकर मोठा स्फोट झाला होता व आग लागण्याची घटना घडली होती. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. या घटनेनंतर तपासणीत तिथे आणखी १३ ते १४ टन दारूगोळा साठवून ठेवल्याचे स्पष्ट झाले होते.

या घटनेला वीस दिवस झाले तरी सरकारने ‘त्या’ कंपनीवर कुठलीही कारवाई केलेली नाही. स्थानिकांनी पोलिस व जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले, तक्रार नोंदवली तरी अजून काहीच हालचाल न झाल्याने नागरिकांनी शुक्रवारी या मूक मोर्चाचे आयोजन केले होते.

यावेळी नागरिकांसमवेत स्थानिक आमदार एल्टन डिकॉस्ता उपस्थित होते. या मार्चात २५ ते ३० नागरिक होते. प्रथम हा मोर्चा जिल्हा प्रशासन संकुलाबाहेर अडविण्यात आला नंतर आमदारांच्या विनंतीवरून सर्वांना आत सोडण्यात आले.

तोपर्यंत कंपनीचा परवाना निलंबित

आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लेटस (आयएएस) यांची भेट घेतली. सध्या चौकशी व तपास सुरू आहे. ज्या दारूगोळ्याचा स्फोट झाला त्याचे अवशेष मुंबईत पाठवले असून त्यांच्याकडून अहवालाची अपेक्षा आहे. शिवाय चौकशी व तपास पूर्ण झाल्यावर अहवालावरून कारवाई केली जाईल. तोपर्यंत कंपनीचा परवाना निलंबित केला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

या कंपनीने २०२३ साली नाकेरी पंचायतीकडे उत्पादन करण्यासाठी अर्ज केला होता; पण त्यावेळी पंचायतीने अर्ज फेटाळला. ज्या रात्री स्फोट झाला व आग लागली, त्यावेळी आम्ही तिथे पोहोचलो. आणखी दारुगोळा नाही, असे त्यावेळी आम्हाला सांगण्यात आले. भेसळयुक्त दारूगोळा साठवून ठेवल्याने स्फोट झाला आहे. ही गंभीर बाब असून चौकशी करून कंपनीवर कारवाई होणे गरजेचे आहे.
एल्टन डिकॉस्ता, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT