Betalbatim bus accident Dainik Gomantak
गोवा

Betalbatim: ज्या बसमधून उतरली, त्याच बसच्या चाकाखाली सापडली; बेतालभाटी येथे ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Betalbatim bus accident: बसमधून उतरल्यानंतर त्याच बसच्या चाकाखाली सापडून एका ७४ वर्षीय ज्येष्ठ महिला ठार होण्याची दुर्दैवी घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बेतालभाटी येथे घडली.

Sameer Panditrao

मडगाव: मडगावातून बाजारहाट करून बसमधून परत घरी जात असताना त्या बसमधून उतरल्यानंतर त्याच बसच्या चाकाखाली सापडून एका ७४ वर्षीय ज्येष्ठ महिला ठार होण्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नागवाडो - बेतालभाटी येथे घडली.

बेर्था मारिया मास्कारेन्हस पिंटो असे या महिलेचे नाव असून ती याच गावातील आहे. कोलवा पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतले असून पुढील तपास चालू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागवाडो येथे बस थांबल्यानंतर बेर्था व अन्य प्रवासी खाली उतरले होते. बसमधून उतरून ती उजव्या बाजूने जात असताना अचानक ती खाली कोसळली व बसच्या चाकाखाली सापडली. गंभीर जखमी झाल्यानंतर तिला इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

वाहनाने ठोकरल्याने अकरा गुरांचा बळी!

मडगाव - कारवार हमरस्त्यावरील पोळे - लोलये येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने अकरा गुरांचा बळी गेला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ही भटकी गुरे हमरस्त्यावर रात्रीच्या वेळी कळपाने बसली होती. त्यांना वाहनाने ठोकरल्याने ती जागीच गतप्राण झाली. ही माहिती पंच अजय लोलयेकर यांना समजताच त्यांनी स्वतःच्या जेसीबीने खड्डे खणून त्यांना पुरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhagwan Mahavir: धुक्यात हरवलेले जंगल, फेसाळणारा दूधसागर आणि वन्यजीवांचा थरार; पावसात नक्की भेट द्या गोव्याच्या 'या' अभयारण्याला

डिचोली बाजारात वीजवाहिन्यांचा धोका; 'स्पार्क'मुळे व्यापारी भयभीत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Goa Sports Complex: कांपाल क्रीडा, व्यापारी सुविधा भाडेपट्टीवर; खासगी संस्थेमार्फत चालविण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Goa Athletics Championship: राज्यस्तरीय ॲथलेटिक्सला मोठा प्रतिसाद; मनोहर पर्रीकर स्मृती स्पर्धेत 2 हजार ॲथलीट्सचा सहभाग अपेक्षित

VIDEO: शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची एन्ट्री; पाकिस्तानचा खरा चेहरा उघड! व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT