Raju Shetti Dainik Gomantak
गोवा

Nagpur Goa Highway: गोव्यात नेमके कोणते शक्तिपीठ? महामार्ग विरोधात रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा राजू शेट्टींचा निर्धार

Nagpur Goa shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गामुळे १२ जिल्ह्यातील नागरिकांचे कल्याण होणार असेल तर फटके खाण्याची तयारी देखील असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.

Pramod Yadav

सिंधुदुर्ग: प्रस्तावित नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी लढा तीव्र करत बुधवारी (१६ जुलै) सावंतवाडीत स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. महामार्ग रद्द होण्यासाठी रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढण्याचा निर्धार शेट्टी यांनी बोलून दाखवला. तसेच, गोव्यात असं कोणतं शक्तिपीठ आहे? असा सवाल देखील शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह विविध नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

नागपूर – गोवा ८०२ किलोमीटर लांबीचा हा महामार्गासाठी ८६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सरकार सांगत आहे. सरकारच्या आजवरच्या कार्यपद्धतीचा विचार करता त्यासाठी दीड लाख कोटींचा खर्च येण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार खर्चाच्या खाईत जाणार असल्याचे मत शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.

शक्तिपीठ महामार्गाच्या कामात ५० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार असून, हा खर्च सर्वसामान्य जनतेच्या खिशातून काढला जाईल, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला. महामार्ग विरोधातील लढा राजकीय नसल्याचे सांगताना शेट्टी यांनी देवधर्माच्या नावाखाली महामार्ग जनतेच्या माथी मारला जात असल्याचा आरोप केला. तसेच, महामार्ग वळवला जाणार असल्याचा आमदार दीपक केसरकरांचा दावा खोटा असल्याचे शेट्टी म्हणाले.

शक्तिपीठ महामार्गामुळे १२ जिल्ह्यातील नागरिकांचे कल्याण होणार असेल तर फटके खाण्याची तयारी देखील असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यातील नागरिक महामार्गाला विरोध करत आहेत, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागिकांनी देखील महामार्गाविरोधात लढा उभारावा, असे आवाहन यावेळी शेट्टी यांनी केले.

गोव्यात असं कोणतं शक्तिपीठ आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. नागपूर ते गोवा विमानाला ३,९०० विमानभाडे लागतं तर, पेट्रोलसाठी १० हजार खर्च होतील, असेही शेट्टी म्हणाले.

गेल्या १२ ते १४ वर्षापासून मुंबई – गोवा महामार्ग रखडला असून, त्यावर सरकारने लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. पण, सरकारने शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा शक्तिपीठचा घाट घातला आहे, असेही शेट्टी म्हणाले. शेट्टी यांनी यावेळी खासदार नारायण राणे यांची देखील याप्रकरणी भेट घेणार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: चार चेंडूंत चार विकेट्स! दुलीप ट्रॉफीत पहिल्यांदाच 'या' खेळाडूने रचला इतिहास; जम्मू काश्मीरचा पठ्ठा चमकला

Viral Video: बापाने मुलाकडून घेतली अशी शपथ, व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक; 'स्वतःचा जीव पणाला लावून...'

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; 'यलो अलर्ट' जारी

Boat Accident: स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट उलटली! 49 जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता; 17 जणांना वाचवण्यात यश

Duleep Trophy 2025: पुनरागमन ठरलं निष्फळ! दुलीप ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीची निराशाजनक कामगिरी, गोलंदाजीत केलं ‘शतक’

SCROLL FOR NEXT