Muttiah Muralitharan: Dainik Gomantak
गोवा

Muttiah Muralitharan in IFFI: क्रिकेटच्या इतिहासातील 'ती' सर्वात वाईट घटना; 'इफ्फी'त बायोपिकनिमित्त मुरलीधरनचा संवाद

IFFI Goa 2023: महान क्रिकेटपटू, श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन बायोपिकविषयी व्यक्त केले मत

Akshay Nirmale

Muttiah Muralitharan at IFFI Goa 2023: ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) रविवारी दिग्गज माजी क्रिकेटपटू, श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन रेड कार्पेटवर अवतरला. मुरलीधरन याने इन कॉन्व्हर्सेशन सत्रात भाग संवादही साधला. निमित्त होते त्याच्या बायोपिकचे. कोमल नाहटा यांनी या संवाद सत्राचे सूत्रसंचालन केले.

‘A Legendary 800 - Against all odds’ असे त्याच्या बायोपिकचे नाव आहे. यात मधुर मित्तल याने मुरलीची भूमिका साकारली आहे. संवाद सत्रात मुरलीचा क्रिकेट लीजेंड बनण्यापर्यंतच्या प्रवास उलगडला गेला. यावेळी त्याने पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर झालेला हल्ला ही क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना होती, असे वक्तव्य केले.

मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट घेतल्या आहेत. हा विक्रम अद्यापही अबाधित आहे. मुरलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 534 विकेट घेतल्या आहेत. शिवाय तो 1996 क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंका संघातही होता.

इन कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलताना मुरलीधरन म्हणाला की, श्रीलंकेतील युद्ध आणि अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर माझी कारकिर्द सुरू झाली होती. त्या गोंधळाच्या काळात क्रिकेट हेच माझ्यासाठी एकप्रकारे सांत्वन होते.

ग्लोरिफिकेशनशिवाय सत्यकथा सांगावी, एवढाच उद्देश या बायोपिकचा आहे. हा बायोपिक माझ्या गौरवाबदद्ल नाही. तर तो सत्य जे आहे तेच आहे. स्क्रिप्टची अनेक वेळा बारकाईने छाननी केल्याचेही त्याने सांगितले.

1995 मध्ये ऑस्ट्रेलियात त्याच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवरून झालेल्या 'चकिंग कॉन्ट्रोव्हर्सी'बद्दल बोलताना मुरलीने दावा केला की हे त्याला खाली खेचण्यासाठी हेतुपुरस्सर केले गेले होते. ते हृदयद्रावक होते. पण मी हार मानली नाही.

या काळात मला माझ्या सहकाऱ्यांकडून आणि क्रिकेट बोर्डाकडून सक्रिय पाठिंबा मिळत राहिला. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना म्हणजे पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर झालेला हल्ला.

दरम्यान, समाजकार्यासाठी मुरली सध्या फाउंडेशन ऑफ गुडनेस ही सेवाभावी संस्था चालवत आहे. त्याद्वारे मुलांच्या गरजा, शिक्षण आणि प्रशिक्षण, आरोग्य सेवा आणि मनो-सामाजिक समर्थन, गृहनिर्माण, उपजीविका, खेळ आणि पर्यावरण यासह विविध प्रकल्पांद्वारे स्थानिक समुदायांना मदत केली जाते.

चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीपथी एम. म्हणाले की, हा चित्रपट केवळ एका सेलिब्रिटी क्रिकेटरचे चित्रण करत नाही तर मुरलीधरनच्या विलक्षण जीवनाला आकार देणार्‍या घटना आणि संघर्षांचा पट आहे.

चित्रपटाचा उद्देश एका आख्यायिकेचे जीवनसार टिपणे आहे, ज्याचा प्रवास मैदानाबाहेरही तितकाच नाट्यमय आहे. मुरलीचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन खूप नाट्यमय आहे.

चित्रपटात मुरलीची भूमिका साकारणारा मधुर मित्तल म्हणाला, “हा केवळ एक स्पोर्ट्स चित्रपट नसून त्यापेक्षा अधिक आहे. एका महान खेळाडूची ही जबरदस्त कथा आहे. क्रिकेटमधील दिग्गजाची भूमिका करणे खूप रोमांचक आणि सन्मानाची गोष्ट आहे.

फिरकी जादूगाराच्या गोलंदाजीच्या कृतीचे अनुकरण करण्यासाठी, मुरलीच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी मी दोन महिने गोलंदाजी प्रशिक्षकासोबत सराव केला.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT