IFFI 2023: करन जोहर पहिल्या रांगेत कसा?; 'इफ्फी'चा बॉलीवूड तमाशा करून टाकला...; आयोजकांवर ज्युरी भडकले

तो बॉलीवूडचा, त्याचा सिनेमाशी काय संबंध...
IFFI 2023
IFFI 2023 Dainik Gomantak

IFFI 2023: 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे रंगारंग कार्यक्रमात उद्घाटन झाले. तथापि, उद्घाटनानंतरच्याच दिवशी 'इफ्फी'च्या एका प्रमुख ज्युरींपैकी एक असलेल्या व्यक्तीने या सोहळ्यावर टीका केली आहे.

इफ्फीचा उद्घाटन सोहळा हा बॉलीवूड तमाशा होता. सर्व नौटंकी सुरू होती, असे म्हणत त्यांनी आयोजकांना फटकारले आहे. अरविंद सिन्हा असे या ज्युरींचे नाव आहे. ते इंडियन पॅनोरमा नॉन-फिचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अरविंद सिन्हा हे एक सुप्रसिद्ध माहितीपट निर्माते आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'इफ्फी'च्या व्यासपीठावरूनच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

IFFI 2023
IFFI 2023: 'इफ्फी'त आज, बुधवारी विजय सेतुपती, के. के. मेनन, बाबिल खान, मधूर भांडारकर, आर. माधवन साधणार संवाद

अरविंद सिन्हा म्हणाले की, करन जोहरसारख्यांना 'इफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्यात पुढच्या रांगांतील सोडाच पण अशा कार्यक्रमांना प्रवेशच देता कामा नये. ते बॉलिवूड आहेत. ते वेगळे आहेत. त्यांचा सिनेमाशी काय संबंध?, असा सवाल सिन्हा यांनी केला आहे.

सर्व काही मिक्स होत आहे. निर्णय घेणाऱ्यांना ठोस निर्णय घ्यावा लागेल. आम्ही हे आणि ते एकत्र करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

इफ्फीच्या उद्घाटन समारंभाबाबत ते म्हणाले की, "करन जोहरसारख्याला त्याच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी इफ्फी सारख्या व्यासपीठाची गरज नाही. आयोजकांनी त्याला पुढच्या रांगेत बसवण्यात जनतेचा पैसा वाया घालवू नये."

इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म सेक्शन ज्युरीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते टी. एस. नागभरणा यांनीही अरविंद सिन्हा यांच्या मतांचे समर्थन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com