Serendipity Art Festival Dainik Gomantak
गोवा

Serendipity Art Festival: येवा गोंय आपलोच असा! गोव्यातला सेरेंडिपिटी नाही पाहिला तर काहिच नाही पाहिलं

एकदातरी सेरेंडिपिटी फेस्टिव्हल पाहावाच लागतोय.

Pramod Yadav

तर, विषय असा आहे भावांनो आणि बहिणींनो की गोव्यात दरवर्षी जगप्रसिद्ध सेरेंडिपिटी (Serendipity Art Festival, Goa) नावाचा हटके आणि निव्वळ कलानुभूती देणारा महोत्सव होत असतो. अनेक विविध क्षेत्रातील नामवंत कलाकार आपली कला घेऊन विविधतेने नटलेल्या गोवा या राज्यात येत असतात. कला हा कल्पनेचा आणि अनुभूतीचा प्रांत आहे. इथं अभिमानाची सगळी शकलं आपोआप गळून पडतात. तुम्ही माप कला आणि कला महोत्सव पाहिले असतील पण, विविध क्षेत्रातील कलाकारांचे वेगळेपण अनुभवायचे असेल तर, एकदा सेरेंडिपिटी फेस्टिव्हल पाहावाच लागतोय.

कलाप्रमेंसाठी सेरेंडिपिटीचा विषय हार्ड आहे.

कलाप्रेमी कलेच्या प्रेमासाठी जग पालथं घालायला तयार असतात. मग 'गोंय आपलोच असा' इथं विविधता एवढी आहे की आपणं ह्रदय इथंच ठेऊन जातोय बघा. विषय काय तर कोरोनाच्या प्रलयकारी संकटानंतर यावर्षी गोव्यात सेरेंडिपिटी ठेक्यात होणार आहे. दहा ठिकाणं निश्चित केल्यात, वेळ, काळ आणि थीम ठरलीय. आता तुम्ही फक्त तुमचं कलासक्त मन घेऊन यायचं आणि दिर्घकाळ सुखावणाऱ्या गोड आठवणी घेऊन जायचं. आणि याहून खोल विषय म्हणजे एवढं सगळं फुकाटात मिळतयं.

वेगळं काय?

कलेच्या व्यापक आणि अफाट विस्तारलेल्या सागरात काही निवडक आणि मनमोहक कलाप्रकार तुम्हाला या सेरेंडिपिटी फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळतील. यात परफॉर्मिंग आर्ट्स, पाककला, हस्तकला, नाटकं, भित्तीचित्र, ओपन फॉर ऑर्टमध्ये प्बलिक आर्ट, मुलांसाठी युवावर्गासाठी विशेष शो, संवाद कार्यक्रम, पुस्तक प्रकाशन, विविध कलाविष्कार, विविध वर्कशॉप, सादरीकरण आणि प्रदर्शन पाहयची संधी मिळणार आहे.

कधी, केव्हा, कुठे?

गोव्यात होत असलेला ‘सेरेंडिपिटी आर्ट्‌स फेस्टिवल’15 ते 23 डिसेंबर या कालावधीत पणजीतील विविध दहा ठिकाणी होणार आहे. कार्यक्रम त्यांची रूपरेषा सगळं ठरलयं. आणि काही शंका असल्याच तर https://www.serendipityartsfestival.com या संकेतस्थळावर मिळतयं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT