New Zuari Bridge: प्रतिक्षा संपली! नवीन झुआरी पूलाचा मुहूर्त ठरला

महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास होणार मदत
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak

झुआरी नदीवरील नव्याने उभारलेला पुल येत्या डिसेंबर संपण्यापूर्वी नागरीकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली आहे. योग्य गुणवत्तेची तपासणी सुरु असल्याने थोडा वेळ जातो आहे. मात्र तो डिसेंबर अखेर लोकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री काब्राल यांनी दिली आहे.

(minister nilesh cabral inform The New Zuari Bridge will open for public before December end )

New Zuari Bridge
Goa Tourism : गोव्यातील पर्यटनासाठी बुकिंग घेणाऱ्या तीन वेबसाइटना नोटीस; पर्यटन खाते अ‍ॅक्शन मोडमध्ये

याबाबत माहिती देताना बांधकाममंत्री निलेश काब्राल म्हणाले की, झुआरी नदीवरील नव्याने उभारलेला केबल स्टेड पूल डिसेंबर महिना अखेर वाहतुकीसाठी खुला होईल, या पुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतुकीचा बोजा कमी होणार आहे. त्याशिवाय या महामार्गावरील वाहतूकही सुरळीत होणार आहे. त्यामुळे वाहन कोंडी ही कमी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

New Zuari Bridge
Goa Mining : खाण क्षेत्राचा नवा अध्याय; स्थानिकांच्या नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य

पुढील काही दिवसात पुलाच्या वजनाच्या आणि इतर काही चाचण्या होणार आहेत. राज्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल सर्वांत महत्त्वाचा आहे. हा पूल वाहतुकीला कधी खुला होणार, याविषयी अनेकांना उत्सुकता लागून होती. वाहनधारकांना डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी हा पुल खुला होणार असल्याने गोमंतकीयांची प्रतिक्षा आता संपणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com