Goa Education DainikGomantak
गोवा

Goa Education: नव्या शैक्षणिक धोरणाला अल्पसंख्याकांचा पाठिंबा, CM सावंतांची भेट घेत निर्णयाचं केलं अभिनंदन

Goa Education Update: गोव्याच्या शैक्षणिक प्रणालीत बदल करण्यासाठी केंद्र सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे.

Sameer Amunekar

पणजी: गोव्याच्या शैक्षणिक प्रणालीत बदल करण्यासाठी केंद्र सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे, त्याची अंमलबजावणी राज्यात करण्यात आली आहे. या निर्णयाला सर्व मुस्लिम समाजातील शैक्षणिक संस्था तसेच अल्पसंख्याकांचे समर्थन असल्याचे प्रतिपादन मुस्लिम समाजाचे नेते उर्फान मुल्ला यांनी केले.

मुल्ला यांनी समाज बांधव तसेच अल्पसंख्यांक शाळांचे प्रतिनिधी यांच्यासोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शासकीय निवासस्थान ‘महालक्ष्मी’ येथे भेट घेत या निर्णयाबद्दल अभिनंदन केले.

दरम्यान, मुल्ला म्हणाले, गोव्यातील सर्व अल्पसंख्याक शाळांनी एनईपी धोरणाचे स्वागत केले असून अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये उर्दू विषयाला कशाप्रकारे प्राधान्य देता येईल यावर चर्चा करण्यात आली.

याबबत जूनपूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंतांची पुन्हा भेट घेत शिक्षण सचालक शैलेश झिंगडे यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल. आमचा एनईपी अंमलबजावणीला पूर्ण पाठिंबा आहे.

वक्फ बोर्ड सुधारणा स्वागतार्ह

आम्हाला गोव्यात वक्फ बोर्ड नको असा निर्णय समाजाने यापूर्वीच घेतला होता. गोव्यात वक्फ अस्तित्त्वात नाही. या निर्णयाला देखील आमचे समर्थन असल्याचे मुल्ला यांनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT