Musicion Ashok Patki playing Harmonium at Studio, (Music Workshop)  Siddhesh Shirsat / Dainik Gomantak
गोवा

Music Workshop: संगीत कार्यशाळेचे प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की हस्ते उद्घाटन

गीत लिहिताना शब्दांचे भांडार स्वतःकडे असणे आवश्यक असते (Vocabulary), डॉ. राजय पवार (Music Workshop)

Siddhesh Shirsat

फातोर्डा: सम्राट क्लब, मडगाव (Saamrat Club, Margao), अंतर्नाद क्रिएशन्स (Antarnad Creation) व पलाश अग्नी स्टु़डीओने (Palash Agni Studio) आयोजित केलेल्या 'गीत जन्मताना' (Geet Janmtana) या गीत लेखन ते संगीतबद्धता पर्यंतचा प्रवास, या ऑनलाईन कार्यशाळेचे (Online Music Workshop) उद्घाटन प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की (Musicion Ashok Patki) यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या दिवशी डॉ. राजय पवार व साईश पाणंदीकर यानी गीत लेखनाबद्दलचे प्रकार (Types of Song writting), अनुभव उदाहरणासह कथन केले. हा एक आगळा वेगळा उपक्रम सर्वार्थाने उपयुक्त असल्याचे पत्की यांनी आपल्या भाषणात सांगितले. कोरोना महामारीत सुद्धा कलाकरांनी वेगवेगळ्या मार्गाने, पद्धतीने लोकांचे मनोरंजन केले असेही संगीतकार पत्की म्हणाले. (Music Workshop)

कविता लिहिताना आपल्या मनातले विचार, स्वतःचे मनोगत आपण शब्दांत चित्रीत करतो. तेव्हा या कवितेचे सुंदर गाण्यात रूपांतर होईल अशी कल्पना नसते. पण गीत लिहिताना गीताच्या वेगवेगळ्या प्रकारांचा उदाहरणार्थ अभंग, भजन, गझल, नंतर मुक्तछंद, छंदमुक्त याचा विचार करावा लागतो. गीत रचताना यमक जुळते का ते बघावे लागते, असे डॉ, राजय पवार (Dr. Rajay Pawar) यांनी सांगितले. शिवाय गीत लिहिताना ते मुलांसाठी किंवा प्रेमगीत, भावगीत, भक्ती गीत त्यानुसार मनातले बोल पक्के व्हावे लागतात व नंतर शब्दांतुन लिहावे लागतात असेही पवार यांनी सांगितले.शिवाय कविता किंवा गीत लिहिताना शब्दांचे भांडार स्वतःकडे असणे आवश्यक असते. साईश पाणंदीकर (Saish Panandikar) यांनी सांगितले की सिनेगीत लिहिणे कठीणच असते. कारण ते लिहिताना सिनेमाचे कथानक, प्रसंग, त्या वेळची पात्रांची भावना हे सर्व लक्षात ठेवुनच गीत लिहावे लागते. शिवाय एकदा गाणे लिहिले की नंतर संगीतकाराच्या सांगण्यानुसार कधी कधी बदलही करावा लागतो. कारण संगीतबद्ध करताना संगीतकाराला मात्रा, ठेका, राग याच्या आधारेच ते गीत संगीतबद्ध करावे लागते असे पाणंदीकर यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT