Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Vasco News : हिंदुस्थान पेट्रोलियमकडून मुरगाव पालिकेला थकबाकी मिळणार : मंत्री गुदिन्हो

मुरगाव पालिकेला कचरावाहू ट्रक प्रदान

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco : हिंदुस्थान पेट्रोलियम इंधन महामंडळाकडून मुरगाव पालिकेला मिळणाऱ्या थकबाकीसंबंधी फाईल नगरविकास खात्याकडून हातावेगळी झाल्यावर मिळणाऱ्या मोठ्या रकमेमुळे मुरगाव पालिकेला आर्थिक स्थैर्य मिळेल. नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी सदर फाईल त्वरित हातावेगळी करणार असल्याचे आपणास सांगितले आहे, अशी माहिती पंचायत मंत्री मविन गुदिन्हो यांनी गुरुवारी येथे एका कार्यक्रमात दिली.

नगरविकास खात्यातर्फे मुरगाव पालिकेला कचरावाहू पाच लहान ट्रक देण्यात आले आहेत. तसेच गोवा शिपयार्डने सीएसआर अंतर्गत मुरगाव पालिकेला २०० कचरा पेट्या दिल्या आहेत. त्यांचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी मंत्री गुदिन्हो बोलत होते. आमदार दाजी साळकर, मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्ज, उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत, नगरसेवक दिलीप बोरकर, नगरसेवक गिरिश बोरकर, अमेय चोपडेकर, प्रजय मयेकर, नगरसेविका शमी साळकर, श्रद्धा महाले व इतर उपस्थित होते.

हरित गोवा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तालुका स्वच्छ राहावा, यासाठी पालिका, पंचायतींनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन गुदिन्हो केले आमदार साळकर म्हणाले, लहान ट्रक मिळाले असून आता कामगार व चालक मिळावेत, यासाठी प्रयत्न करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT