Panaji Market Dainik Gomantak
गोवा

Municipal Corporation: अष्टमीच्या फेरीची मुदत संपली असली, तरीही खरेदीसाठी वर्दळ!

Panaji: महापालिकेने गणेशोत्सवासाठी भरविलेली अष्टमीच्या फेरीची मुदत संपली असल्याने काही व्यवसायिकांनी आपली दुकानांची आवराआवर केली आहे

दैनिक गोमन्तक

Panaji: महापालिकेने गणेशोत्सवासाठी भरविलेली अष्टमीची फेरीची मुदत संपली असल्याने काही व्यवसायिकांनी आपली दुकानांची आवराआवर केली आहे. तर काही जण उद्या रविवार सुटी असल्याने लोक खरेदीसाठी येतील, या आशेवर आहेत. त्यांनी आपली दुकाने तशीच थाटलेली आहेत. तसेच काही लोक खरेदीसाठी मांडवीच्या किनाऱ्याकडे वळत होते.

दुकानांची आवराआवर करताना खरेदी करण्यात अनेक ग्राहकांना आनंद असतो. अनेक दुकानदार उगाच ओझे नेण्यापेक्षा खरेदीची किंवा कमी नफा मिळाला तरी जालेल या भावाने वस्तू विकतात. त्याचाच विचार करून अनेकजण फेरीकडे येताना दिसत होते. शाळांनाही सुटी असल्याने कुटुंबाबरोबर येणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. भाऊसाहेब बांदोडकर मार्गावर एका बाजूला चारचाकी वाहनांच्या उभ्या राहणारी वाहने त्याचीच साक्ष देत होती.

अर्जाच्या काळाबाजारामुळे उशीरा सुरू झालेल्या फेरीची मुदतही महापालिकेने दुकानदारांना वाढवून दिली. त्यामुळे चतुर्थीपूर्वीनंतर किनाऱ्यावर जत्रा भरल्यासारखा भास होत होता. कपड्यांची वेगवेगल्या ठिकाणी उभारणी आणि मध्येच लाकडी साहित्याची दुकाने थाटली गेल्याने अनेकजण अर्धी फेरीच फिरून साहित्य खरेदी करीत होते.

* यंदा नियोजनाचा चांगला अभाव-

महापालिकेला या फेरीतून दुकान भाड्यातून लाखो रुपयांचा महसूल मिळतो. परंतु यावेळी नियोजनाचा अभावा दिसून आल्याने अर्ज विक्री चतुर्थीच्या तोंडावर करावी लागली आणि अर्जांचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार घडला. त्यावर आता या प्रकाराची महापालिका आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT