राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Dobal) आज मुंबई दौऱ्यावर आले आहेत. डोवाल यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ (Rajnish Seth) यांची भेट घेतली. अजित डोवाल यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काही दिवसांपासून मुंबईत घातपात करण्याच्या आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे. डोवाल यांनी दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यावेळी एक महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीपूर्वी डोवाल यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत 45 मिनिटं चर्चा केली.
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट आढळून आली होती. ज्यात तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. गणेशोत्सव आणि घातपातच्या पार्श्वभूमीवर अजित डोवाल यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.